बेलापूरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सहात साजरी

बेलापूरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सहात साजरी
“ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे” असे ठणकावून सांगणारे, बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 102 वी जयंती येथील विजय स्तंभ चौकामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी रमेश शेलार, सुहास शेलार, तानाजी शेलार, विजय शेलार, भाऊसाहेब राक्षे, बाबासाहेब शेलार, उदय शेलार, बंटी शेलार आदि जेष्ठ समाज बांधवांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बेलापूर येथील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध राजकीय पक्ष, संस्था-संघटना व ग्रामपंचायतिचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सायंकाळी अण्णाभाऊंच्या प्रतिमेची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळीआमदार लहूजी कानडे, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण नाईक, बेलापूर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले, माजी जि प सदस्य शरद नवले, जनता विकास आघाडीचे रवींद्र खटोड, सरपंच महेंद्र साळवी, माजी सरपंच भरत साळुंके, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक, मुक्तार सय्यद, माजी उपसभापती दत्ता कुऱ्हे, विलास मेहेत्रे, पंडित बोंबले, प्रकाश कुऱ्हे, अनिल पवार, अय्याज सय्यद, पत्रकार विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, दीपक क्षत्रिय, किशोर कदम, अतिश देसरडा, भाऊसाहेब तेलोरे, अल्ताफ शेख, शशिकांत कापसे, बाळासाहेब दाणी आदी मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊंना जयंतीनिमित्त अभिवादीत केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहन शेलार, उपाध्यक्ष दिनेश सकट, रोहित शेलार, निखील शेलार, संकेत शेलार, तुषार शेलार, संदेश शेलार, अदित्य शेलार, सचिन खाजेकर, अतिश शेलार, निशिकांत शेलार, रामा उमाप, ऋतिक शेलार यांच्यासह बाळासाहेब शेलार, नंदू शेलार, सुभाष शेलार आदींनी विशेष परिश्रम घेतले.