न्यू इंग्लिश स्कूल व सेवा संस्था टाकळीभान यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा.

न्यू इंग्लिश स्कूल व सेवा संस्था टाकळीभान यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा.
टाकळीभान प्रतिनिधी: ६ जानेवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पा. जुनिअर कॉलेज टाकळीभान व टाकळीभान सेवा संस्थेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल येथील कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक करताना पाचपिंड सर म्हणाले की आपल्या निर्भीड व निपक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवणारे व आपल्या लेखणीतून समाज जनजागृती करणारे लोकशाहीचे खरे आधारस्तंभ पत्रकार बांधव आहेत.निस्वार्थी भावनेने समाजसेवेचे काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा आपण सन्मान केला पाहिजे असे ते म्हणाले.या प्रसंगी सर्व पत्रकार बांधवांचा विद्यालयातर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार अर्जुन राऊत व बापूसाहेब नवले यांनी सत्काराबद्दल सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने विद्यालयाचे धन्यवाद मानले. याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य बी.टी. इंगळे, श्रीमती वैजयंती सोनवणे, सागर काळे सर ,सुरेश गलांडे आदी सह सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आदिनाथ पाचपिंड सर यांनी केले. तर आभार बनकर सर यांनी मानले. तर सेवा संस्थेमध्ये संस्थेचे सचिव रघुनाथ शेळके व रामदास ब्राह्मणे, छोटू बनकर यांनी स्वागत करून सर्व पत्रकारांचा सन्मान केला. या बद्दल पत्रकार सेवा संस्थेच्या वतीने टाकळीभान सेवा संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.