पुढील अनेक वर्ष ऊस उत्पादकांसाठी सुकाळ – पंजाब डख*

*पुढील अनेक वर्ष ऊस उत्पादकांसाठी सुकाळ – पंजाब डख*
*ऊस गाळपात जयभवानी राजकारण करणार नाही – अमरसिंह पंडित*
*जय भवानीच्या ४० व्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ*
*पुढील अनेक वर्ष या भागात चांगले पर्जन्यमान राहणार असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी सुकाळ ठरणार असल्याचा हवामान अंदाज सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला. जय भवानीची गाळप क्षमता वाढल्यामुळे कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक राहणार नाही, ऊस गाळपात कोणतेही राजकारण जय भवानी करणार नसल्याचे प्रतिपादन चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. जय भवानीच्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख, ह.भ.प. शिवाजी महाराज, माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्यासह कारखान्याचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी, ऊस वाहतुकदार, सभासद आदी उपस्थित होते*
*या कारखान्याच्या नावात जय आहे आणि त्याला भवानी मातेचा आशिर्वाद आहे त्यामुळे कारखान्याचे भविष्य उज्वल आहे*
*चेअरमन अमरसिंह पंडित यांनी शेतकर्यांच्या हितासाठी कारखान्याची गाळप क्षमता वाढविली असल्याने शेतकर्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. येणार्या काळात हवामान चांगले राहणार असुन पुढील अनेक वर्ष पाऊस काळ उत्तम राहणार आहे*
*हे सांगतांना हवामान विषयक अंदाजाच्या अनेक अभ्यासपुर्ण युक्त्या हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी आपल्या भाषणादरम्यान दिल्या उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले*
*जय भवानीच्या ४० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्य अतिथी म्हणुन पंजाब डख बोलत होते. श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव (दादा) पंडित, चेअरमन अमरसिंह पंडित, व्हा. चेअरमन जगन्नाथ शिंदे, माजी चेअरमन जयसिंग पंडित यांच्यासह कारखान्याचे संचालक, सभासद, विविध संस्थांनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गव्हाणीमध्ये विधिवत ऊसाची मोळी टाकुन उत्साहात गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला*