विधवा नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्ष मंगला जाधव तर उपाध्यक्ष मंगल खरात यांची एक मताने निवड,

विधवा नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्ष मंगला जाधव तर उपाध्यक्ष मंगल खरात यांची एक मताने निवड,
टाकळी भान येथे पत्रकार दिलीप लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली, नुकतेच विधवा नारी शक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांची बैठक पार पडली, या बैठकीत अध्यक्षपदी मंगल जाधव ,व उपाध्यक्षपदी मंगल खरात, तर सचिवपदी तिलोतमा शिंदे,यांची एकमताने निवड करण्यात आली,
समाजात विधवा महिला कडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी व विधवा महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे,यासाठी, संघटनेने पुढाकार घेतला आहे, विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभापासून वंचित आहे , त्यांच्या मुलांना शिक्षणाठी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे शासनाचे डोल व घरकुल योजनेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे, यासाठी या संघटने पुढाकार घेऊन, शासन दरबारी पाठपुरावा करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा देण्यात येईल, यासाठी सघटनेचे काम करत आहे,
नूतनअध्यक्ष मंगल जाधव उपाध्यक्ष मंगल खरात यांचे निवडीबद्दल हरपुष्प श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,
तर विधवा महिलांनी या संघटित सामील होऊन संघटनेची ताकद वाढवा, असे अहवाल अध्यक्ष मंगला जाधव यांनी केले,
या प्रसंगी मीरा गवंदे, सुनिता शिरसाठ,सुनिता धुंळसैदर, संगीता वाकडे, अरुणा पाबळे ,मंगल माने, प्रमुख उपस्थिती होत्या, यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.