स्वतः कडे जर लघुत्व घेतल तर समोरच्या मध्ये गुरुत्व आपोआप दिसतं*

*स्वतः कडे जर लघुत्व घेतल तर समोरच्या मध्ये गुरुत्व आपोआप दिसतं*
*दृष्टी नुसार परिणाम असतात . आपण काय कसं आणि कोणत्या भावनेने पाहतो त्यानुसार परिणाम स्पष्ट होतात*
*आपला समोरच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर बरंच काही अवलंबून आहे*
*जर आपण स्वत कडे लघुत्व घेऊन समोरच्या मध्ये गुरुत्व पाहता येण हे सगळ्यात मोठं कौशल्य आहे* .
*परंतु जगातील सगळ्यात अवघड व कठिण हिच गोष्ट आहे कि स्वतः कडे लघुतव ठेवून समोरच्या मध्ये गुरुत्व पाहण्यासाठी कोणीही तयार नाही*
*प्रत्येकाच्या मते आपण स्वतः प्रचंड मोठे व प्रभावी आहेत आणि सगळी गफलत इथेच होत आहे*
*सध्या समजिक जीवनात खर कौशल्य आहे ते इतरांन मध्ये इतरांच्या कडे असणारे सद्गुण , विद्वत्ता मोठेपणा पाहण्याची दृष्टी*
*दिव्यता , शक्ति ,मनाचा मोठेपणा निर्माण होणं आणि स्वतः कडे लघुतव ठेवता येण म्हणजे जग जिंकता येत . आजही ग्रामीण भागात लोक मन प्रचलित आहे. कि हत्ती होऊन लाकड फोडण्या पेक्षा मुंगी होऊन साखर खाता येण हे उत्तम पुरुषाच लक्षण आहे*
*परंतु हेच उत्तम पुरषांच लक्षण सध्याच्या युगात प्रत्यक्षात कोणी*
*आचरणात आणताना दिसत नाही .हि फार खेदजनक बाब आहे . उलट पक्षी खोट्या आणि बेगडी प्रतिष्ठेसाठी भौतिक मोठेपणा लोकमनावर बिंबवण्यासाठी स्वतः चा मोठेपणा सिद्ध*
*करण्यासाठी अहोरात्र बैचेन मग्न व्यस्त*
*असलेली आणि भौतिक मोठेपणा हा जणुकाही एखाद्या आजार आहेया पद्धतीने*
*वावरताना दिसणारी माणसं सध्या आपल्या आजुबाजूला इतरत्र दिसतात*
*आणि म्हणून याच कालखंडात जर आपल्याला आपल्या स्वतः कडे लघुतव ठेवता आले तर आपल्या साठी जगातील*
*अशक्य असे कहीच नाही .आपल्या सोबत , सहवासात, आजुबाजूला,किंवा विरोधात कोणीही व्यक्ती समाज घटक असु द्या समोरच्याला मोठेपणा देऊन आपल्या स्वतः कडे लघुतव घेण*
*हि जीवनातील सगळ्यात मोठं कौशल्या हे कौशल्य सगळ्यांकडे उपलब्ध आहे.परंतु त्याचा वापर कसा करायचा आहे हे मात्र व्यक्ती परत्वे वेगवेगळे आहे. लघुतव हि चुंबकीय शक्ती आहे आणि ती जर जागृती झाली तर*
*जगातील कोणालाही आपण आपल्या कडे खेचु शकतो पण तेवढा मनाचा मोठेपणा आपल्या कडे असला पाहिजे.आणी तो प्रकाट झाला पाहिजे*
*वास्तविक सध्याचं युग हे भौतिक मोठेपणाला भुललेल जग आहे .असं जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही*
*खोटा मानपान प्रतिष्ठा या साठी लोक कुठल्याही स्तरावर जाण्यासाठी तयार आहेत असंच एकंदरीत वातावरण निर्माण झालेलं आपण पाहतोय*
*आणि सध्या जी परिस्थिती आपण अनुभवतोय याच्या तुन एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती हि कि*
*दुस-याला मोठेपणा बहाल करण्याचा मनाचा मोठेपणा आज लोप पावत चाललेला आहे* .
*प्रत्येक व्यक्ती मी कशाप्रकारे मोठा आहे याचं विश्लेषण करण्या मध्ये तसेच दाखवण्यात मग्न आहे .त्यासाठी अनेक असे नानाविध प्रयोग करताना अनेक जण दिसतात इतर लोकांनी मला मोठं म्हटलं पाहिजे .माझी स्तुती केली पाहिजे. अशी जवळपास प्रत्येक व्यक्ती ची धारणा आहे . त्या साठी वाटेल ते करण्याची मानसिकता आहे. पण स्वतः कडे लघुतव ठेवण्याचे संस्कार आणि प्रवृत्ती खुप कमी लोकांच्या कडे दिसते आहे. आणि ज्याला स्वतः कडे लघुतव ठेवण्याचे कार्य जमलं त्याने जग सहज जिंकले .लघुतव स्वतः कडे ठेवणं हि सर्वसाधारण गोष्ट नाही एक प्रकारची साधना तप आहे पण हे तप हि साधना ज्याला प्राप्त झाली . त्याला या सृष्टीवर दिव्य दृष्टी प्राप्त झाली. म्हणून ज्याच्या कडे हि शक्ती आहे त्याला या जगात , काय,दुःख , काय, वेदना, काय समस्या,असणार उलट संबंध सृष्टी वरील शक्ति उर्जा त्याच्या साठी सकारात्मक*
*असेल .आणि सृष्टीवरील कुठलही कार्य, कर्म निर्विघ्नपणे पुर्ण करण्याची ताकद शक्ती निर्माण होण्यासाठी स्वतः कडे लघुतव ठेवता आलं पाहिजे*.