तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींवर आता येणार प्रशासकराज*

*तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींवर आता येणार प्रशासकराज*
*आष्टी-तालुक्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश ग्रामविकास विकास विभागाने पंधरा दिवसांपूर्वी काढले होते.आता लवकरच तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्याचे आदेश काढण्यात येणार आहे.त्यामुळे या ग्रामपंचायतीत निवडणुका होईपर्यंत प्रशासकराज राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे*
*निवडणूक आयोगाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नाही.तर निवडणूक कार्यक्रम अजून दोन महिने जाहीर होणार नसल्याचे बोलले जाते.त्यामुळे ग्रामविकास विभागाने निवडणुका होईपर्यंत या करण्याचे निर्णय घेतला.त्यासंबंधीचे पत्र सुद्धा सर्व जिल्हा परिषदांना दिले आहे*
*एका विस्तार अधिकाऱ्यावर तीन-चार ग्रा.पं.चा भार*
*तालुक्यात आधीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची वानवा आहे. विस्तार अधिकाऱ्यांवर तीन ते चार ग्रामपंचायतीचा भार सोपविण्यात येणार आहे. प्रशासक म्हणून त्यांना या ग्रामपंचायतींचा कारभार हाकायचा आहे.त्यातच त्यांच्या मूळपदाची जबाबदारी सांभाळून ही हे कामकाज करायचे आहे*
*ग्रामसभेला विश्वासात घेऊनच करता येणार कामे*
*प्रशासक म्हणून नियुक्त प्रशासकाला कुठल्याही कामासाठी खर्च अथवा विकास कामे परस्पर करता येणार नाहीत.कोणतेही विकास काम करताना अथवा त्याला मंजुरी देताना ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असणार आहे. त्याशिवाय ते काम करता येणार नसल्याचे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे*
*विकास कामांना लागणार ब्रेक*
*ग्रामपंचायतच्या निवडणुका दोन-तीन महिने लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे तोपर्यंत ग्रामपंचायतंर्गत विकास कामांना ब्रेक लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे किमान तरी गावगाड्याचा विकास रखडणार असून कोट्यवधी रुपयांचा निधी तसाच पडून राहणार,हे स्पष्ट झाले आहे*.