गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कायदा कडक नाही म्हणून कसाई मोकाट…. कायदा कडक करा- सागर बेग 

सागर बेग

कायदा कडक नाही म्हणून कसाई मोकाट…. कायदा कडक करा- सागर बेग 

श्रीरामपूर(प्रतिनिधी):- सलमान खानने दोन काळवीट मारल्या प्रकरणी जोधपूर न्यायालयाने त्याला पाच वर्षाची सजा सुनावली ते प्रकरण भारतभर गाजले पण गोहत्या बंदी कायदा असूनही आणि दररोज शेकडो गोमातेंचा बळी घेणारा कसाई मात्र अनेक गुन्हे दाखल होऊनही कायदा कडक नसल्याने आज मात्र मोकाट आहे.

तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या काळात जिल्हाभर बोकाळलेले अवैध धंदे आजही चालू आहेत तर त्यांच्याच काळात गोहत्या बंदी कायदा असूनही पोलिसांच्या नाकावर टिच्चून थेट पोलिस ठाण्यासमोरून भरदिवसा शेकडो टन गोमासांची वाहतूक अवघ्या आठ दिवसांत होते तरी पोलिस बघ्यांची भूमिका घेतात यास श्रीरामपूरकर साक्षीदार आहेत.नुकतीच पोलिस अधीक्षक पदी पूर्वी श्रीरामपूरात DYSP पदावर राहून गेलेले सोमनाथ घार्गे यांची वर्णी लागल्याने त्यांच्याकडून श्रीरामपूरकरांबरोबरच संपूर्ण जिल्ह्याच्या आशा लागून आहेत.पाच सहा महिन्यांपूर्वी राहाता तालुक्यातील ममदापूर याठिकाणी सर्वात मोठी गोहत्या करणाऱ्या कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात आली कत्तली होणारे ठिकाणे जमीनदोस्त करण्यात आले मोठा फौज फाट्यासह करण्यात आलेल्या या कारवाईचा जिल्हाभर मोठा गवगवा झाला होता.परंतु आज परिस्थिती पुन्हा जैसे थे आहे.त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोहत्या आजही केली जात आहे आणि तेथूनच मोठ्याप्रमाणात रात्रीअपरात्री जिल्हाभर व जिल्ह्याबाहेर गोमांस सप्लाय केला जातो.राजरोसपणे पुन्हा चालू झालेल्या या अवैध धंद्याकडे पोलिसांनी लक्ष दिलेले नाही म्हणजे सहा महिन्यांपूर्वी झालेली कारवाई गौप्रेमींना भुलवण्यासाठी होती का..?असा प्रश्न समोर येतो.

एक महिन्यांपूर्वी शुक्रवार बाजारच्या दिवशी भरदिवसा शहर पोलिस ठाण्यासमोरून चाळीस टन गोमांसाने भरलेला चौदा चाकी ट्रक राष्ट्रीय श्रीराम संघाच्या धर्मरक्षकांनी पकडल्या नंतर शहरातील वॉर्ड नंबर दोन मध्ये व ममदापूर येथे मोठ्या प्रमाणात गोहत्या बंदी कायदा पायदळी तुडवला जात असल्याचे सिद्ध झाले आहे.जोपर्यंत गोहत्या बंदी कायदा शासन कडक करणार नाहीत तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत अशी मागणी वेळोवेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी आपल्या धर्मकार्यातून केलेली आहे परंतु त्यास अद्यापपर्यंत शासनाकडून म्हणावा असा प्रतिसाद अद्याप मिळाला नसल्याचे गोहत्या जोरात चालू असल्याचे स्पष्ट होत आहे.

बेलापूर गावात बेकरी मध्ये पकडण्यात आलेल्या गोमांस मुळे सागर भैय्या बेग यांनी केलेल्या गोहत्या बंदी कायदा कडक करा या मागणीला ताकद मिळत आहे.कारण मोठमोठ्या कारवाया होऊनही कारवाई केलेले आरोपी आजही मोकाट फिरत असल्याने कायदा जोपर्यंत कडक होणार नाही तोपर्यंत पोलिसी कारवाई होणार आणि आरोपी दुसऱ्या दिवशी तुरुंगातून बाहेर येणार आणि पुन्हा तोच धंदा तेजीत चालवणार ते थांबण्यासाठी गोहत्या बंदी कायदा कडक होने अत्यंत जिकरीचे होऊन बसले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे