सामाजिक सलोखा राखण्यात यश मिळविल्या बद्दल पो.नि.प्रताप दराडे यांचा मराठा एकीकरण समिती कडून सन्मान – देवेंद्र लांबे पा.*

*सामाजिक सलोखा राखण्यात यश मिळविल्या बद्दल पो.नि.प्रताप दराडे यांचा मराठा एकीकरण समिती कडून सन्मान – देवेंद्र लांबे पा.*
राहुरी येथील पोलीस स्टेशनचे नव्यानं दाखल झालेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून राहुरी शहर तथा तालुक्यामध्ये या ना त्या कारणावरून कोणत्याही वादाला जातीय स्वरूप देवून राजकीय जिरवाजिरवी करण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते.या गुन्ह्यांमुळे जातीजातीमध्ये तेढ निर्माण होऊन राहुरी तालुक्यातील वातावरण पूर्णपणे दूषित झाले होते.पूर्वीपासून शांतप्रिय समजला जाणारा राहुरी तालुका कोणत्या न कोणत्या वादामुळे नगर जिल्ह्यात चर्चेत आला होता.
मध्यंतरी वाढत्या चोऱ्या,वाहतूक कोंडी,व्यावसायिकांच्या दुकानांसमोर वाहनांची अस्थव्यस्थ गर्दी,अवैध व्यवसाय,आर्थिक अमिशापोटी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे,जातीय तेढ निर्माण होईल असे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणात वाढ झाली होती.तालुक्यात सर्वसामान्य लोक भयभीत झाले होते.कुठेही किरकोळ वाद झाले कि त्यास मोठे स्वरुप देवून वाद विकोपाला जाण्याचे प्रमाणात वाढ झाली होती.
परंतु राहुरी पोलिस ठाण्यात नव्याने दाखल झालेले पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पदभार स्विकारताच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तात्काळ नियोजन करून विस्कटलेली कायदा-सुव्यवस्थेची घडी पुन्हा बसविण्याचा प्रयत्न पो.नि.दराडे यांनी केला आहे.
त्याच विषयास अनुसरून मराठा एकीकरण समिती राहुरी तालुक्यातील गाव समन्वयकांनी एकत्र येत पो.नि.दराडे यांचा सन्मान केला.
या प्रसंगी मराठा एकीकरण समितीचे मुख्य समन्वयक देवेंद्र लांबे पाटील म्हणाले की,राहुरी तालुक्याला आम्ही आमचे कुटुंब समजतो;कुटुंबातील कोणत्याच सदस्याला कोणत्याच प्रकारची अडचण येवू नये म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो.तालुक्यात मधल्याकाळात सामाजिक परिस्थिती अतिशय विदारक झाली होती.मराठा एकीकरण समितीकडून यापूर्वी अनेकवेळा आंदोलने करण्यात आलेली आहे.समितीच्या वतीने एखादा अधिकारी नवनियुक्त होवून आल्यास कधीच सत्कार केला जात नाही.अधिकाऱ्यांनी चागले काम केल्यास मराठा एकीकरण समिती कौतुक करते.पो.नि.दराडे यांनी राहुरीत दाखल होत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे..भविष्यकाळात देखील अवैध व्यवसाय,महिला मुलींची छेडछाड करणाऱ्या विकृतींचा बंदोबस्त,चोऱ्या,खोटे गुन्हे यांचा बंदोबस्त करावा.तसेच पो.नि.दराडे यांनी गैरसमजुतीतून दाखल होणारे गुन्हे समपोदेश करून सामोपचाराने सोडविण्यात यश मिळविले आहे.हे गुन्हे दाखल झाले असते तर होतकरू तरुणांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला असता.असे लांबे पाटील म्हणाले.
या प्रसंगी मराठा एकीकरण समितीचे संदीप गाडे,सतीष घुले,विनायक बाठे,अविनाश दिघे,डॉ.भारत टेमक,किशोर कोबरणे,संदीप गीते,राहुल अडसुरे,किशोर म्हसे,सचिन चौधरी,दिनेश झावरे,अनिल आढाव,निखील कोहकडे,विलास तरवडे,अविनाश पवार,गणेश माळवदे,रमेश म्हसे,महेंद्र शेळके,विनोद मुसमाडे,सुनिल निमसे,मधुकर घाडगे,सागर ताकटे,अरुण चव्हाण,चौधरी सर,गौरव तनपुरे,कैलास कोहकडे,गोपी लांबे आदी उपस्थित होते.