ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था बारामती खंडोबा नगर येथील युवा कीर्तनकार ह. भ. प.वैभव महाराज दहिघुले

*ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था बारामती खंडोबा नगर येथील युवा कीर्तनकार ह. भ. प.वैभव महाराज दहिघुले
यांची एकादशी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला हा शब्द प्रकाश*कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन करणारे : युवा कीर्तनकार ह. भ. प.वैभव महाराज दहिघुले
( आज दिनांक 23आगस्ट 2022 रोजी युवा कीर्तनकार ह. भ. प.वैभव महाराज दहिघुले यांची एकादशी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला हा शब्द प्रकाश मानवी जीवनात संस्काराला महत्त्वाचे स्थान आहे. तसेच संगतीलाही महत्त्वाचे स्थान आहे. संत म्हणाले-चंदनाचे संगे पलटल्या बोरी या न्यायाप्रमाणे चांगल्याच्या सहवासात राहिल्यास आयुष्यामध्ये चांगुलपण येते. तर वाईटाच्या संगतीत वाईट होते. संत म्हणाले
ढेकणाचे संगे हीरा जो भंगला lकुसंगे नाडीला साधु तैसा ll
घरात चांगले संस्कार झाले की बालमनावर त्याचा चांगला संस्कार होतो व बालक चांगले संस्कार लगेच ग्रहण करते. घरात धार्मिक कार्याची आवड वडील रंगनाथ केशव दहिघुले व
वारकरी संप्रदायावर जिवापाड प्रेम करणारे व आई सौ. ऊषा रंगनाथ दहिघुले याही देवधर्मावर विश्वास ठेवणाऱ्या. त्यांच्या पुण्याईमुळे पोटी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन करण्याचे काम सुपुत्र युवा कीर्तनकार ह. भ.प.वैभव महाराज दहिघुले करू लागले.म्हणतात ना -कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक घरात सात्विक मुलगा किंवा मुलगी जन्माला आली व ते सात्विक कार्य करू लागले व त्यांच्या सर्वत्र नावलौकिक व्हायला लागला की त्याचा आनंद आई-वडिलांना व्हायला लागतो. संत म्हणाले
पुत्राचे विजयी पिता सुखावत जाय
या न्याप्रमाणे आई-वडिलांना आनंद वाटणे साहजिक आहे. केवळ आई-वडिलांनाच आनंद वाटतो असे नाही तर ईश्वराला देखील अशा सुपुत्राबद्दल आनंद वाटतो. आणि त्यातल्या त्यात असा सुपुत्र जर ईश्वराचीच सेवा करू लागला तर दुग्ध शर्करा योग मानावा लागेल.खरे तर आपल्या वंशाचा,परंपरेचा वारसा मुलांनी पुढे चालवणे हेच खरे धार्मिक कार्य आहे. म्हणूनच माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितले की
याप्रमाणे युवा किर्तनकार शिवाजी महाराज शेळके व गणेश महाराज वाघले वारकरी सांप्रदाय, गीता, भागवत व वडिलांचे वारकरी विचार यांना कीर्तनाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचे कार्य करत आहेत.त्यांच्या नावातच प्रकाश आहे.प्रकाश पडला की अंधार दूर होतो, मग तो अज्ञानाचा असो, अविवेकाचा असो, दुरिताचा असो की अविकासाचा असो. हे सर्व दूर करण्याचे काम वैभव महाराज करताहेत व भविष्यातही करत राहतील.
महाराजांच शिक्षण ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था बारामती खंडोबा नगर येथे शिक्षण पहिल्या वर्षापासुन ते 10 त शिकत आहेत या संस्थेतील ह भ प युवा किर्तनकार व भारूड संब्राट शिवाजी महाराज शेळके व मृदंगचार्य गणेश महाराज वाचले यांच्या संस्कारामुळे त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच वारकरी कीर्तन करायला सुरुवात केली. त्यापूर्वी वयाच्या साहव्या वर्षीपासून ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था बारामती खंडोबा नगर येथे वारकरी शिक्षण घेणे सुरू केले. ज
येथे ह भ प गुरुवर्य भारूड संब्राट व युवा किर्तनकार शिवाजी महाराज शेळके व मृदंगाचार्य ह भ प गणेश महाराज वाघले ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक शिक्षण घेतले. त्यानंतर पारमार्थिक सेवा प्रारंभ केली
ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्याकडून भविष्यात अशीच सेवा घेत राहो व या सेवेसाठी त्यांना दीर्घायु आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.व मी माझा शब्दप्रपंच थांबवतो.