आईच्या पुण्यस्मरण निमित्त केशर आंब्याचे 101 वृक्ष रोपांचे वाटप…

आईच्या पुण्यस्मरण निमित्त केशर आंब्याचे 101 वृक्ष रोपांचे वाटप…
टाकळीभान: येथील रमेशराव गायकवाड व सुरेश गायकवाड या बंधूंनी आपल्या मातोश्रींच्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त निमित्त 101 वृक्षांचे वाटप करून एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला, याचे उपस्थित मान्यवर, मित्र मंडळ, नातेवाईक, ग्रामस्थ यांनी कौतुक केले.
यावेळी वृक्षरोप वाटपाचा शुभारंभ प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ह भ प आरती ताई शिंदे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थितांना 101 केशर आंब्याची रोपे वाटण्यात आली.
याप्रसंगी गायकवाड कुटुंबीयांच्या वतीने भोजन केल्यानंतर प्रत्येकास एक वृक्ष रोप भेट देण्यात आले. निसर्गाच्या समतोलासाठी वृक्षारोपण गरजेचे असून या वृक्षारोप वाटपाच्या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले व असे उपक्रम कार्यक्रम प्रसंगी राबवण्याची गरज असल्याची भावना प्रत्येकाने व्यक्त केली.
याप्रसंगी माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, ज्येष्ठ नेते राधाकृष्ण वाघुले,प्रा. कार्लस साठे सर, उपसरपंच कान्हा खंडागळे, ज्येष्ठ ग्रामस्थ अण्णासाहेब दाभाडे, शिवसेनेचे राधाकिसन बोरकर,निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे अर्जुन राऊत, भाऊसाहेब पटारे,बाळासाहेब शेळके, गजानन कोकणे ,बंडोपंत बोडखे, मधुकर गायकवाड, सुनील बोडखे पाराजी पठारे आदीसह ग्रामस्थ, गायकवाड परिवारचे मित्र मंडळ व नातेवाईक उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल पर्यावरण मंडळाचे अर्जुन राऊत यांच्यावतीने गायकवाड कुटुंबीयांचे आभार व्यक्त करण्यात आले