महाराष्ट्र
नेवासा पोलिस ठाण्याच्या कारभार पुन्हा विजय करे यांच्या हाती.

नेवासा पोलिस ठाण्याच्या कारभार पुन्हा विजय करे यांच्या हाती.
सोनई आॅडिओ क्लीप प्रकरणात पोलीस नियंत्रण कक्षात बदली झालेले नेवासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हाती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील सोपवला आहे तरवडी प्रकरणात पोलीस निरिक्षक बाजीराव पोवार यांची वादग्रस्त विधानं त्यांना अंगाशी आल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे विजय करे पुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने करे कशी कामगिरी करतात हे पाहाणे महत्वाचे आहे ते आॅडिओ प्रकरणाचा लागलेला डाग कशा प्रकारे पुसून स्वताची स्वचछ प्रतिमा तयार करतात हे येणारा काळच ठरवणार आहे विजय करे डॅशिग तसेच अतिशय हुशार अधिकारी म्हणून ओळखले जातात गुन्ह्यांच्या तपासासाठी बाजी लावणारे अधिकारी म्हणून करे परिचित आहेत