दोघांना अज्ञात वाहनाची धडक, राऊत यांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

दोघांना अज्ञात वाहनाची धडक, राऊत यांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत १ आडत व्यापारी जागीच ठार झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना गेवराई तालुक्यातुन जाणाऱ्या गेवराई- शेवगाव या महामार्गावरील उमापूर गाव परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. गोपाल राऊत असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
गोपाळ राऊत व त्यांच्या सोबत मनोज पाटनी हे दोघे नेहमीप्रमाणे आज पहाटे मॉर्निग वॉक करायला गेले होते. या दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना धडक देत उडविले. यामुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात गोपाळ राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे सहकारी मनोज पाटनी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ संभाजीनगरला हलवण्यात आले आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात, अज्ञात वाहनधारका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.