भांडणाच्या रागातुन पहाटेच्या वेळेस घराचे नुकसान करुन गाड्या जाळल्या पोलीसामुळे मोठा अनर्थ टळला

भांडणाच्या रागातुन पहाटेच्या वेळेस घराचे नुकसान करुन गाड्या जाळल्या पोलीसामुळे मोठा अनर्थ टळला
पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेलापुरातील खटकाळी गावठाण पाहुणेनगर येथील शेख यांच्या घरावर लाकडी दांडके कुऱ्हाड धारदार हत्याराने हल्ला चढविला घराच्या काचा दरवाजे तोडून घरासमोर लावलेल्या दुचाकीही पेटवुन दिल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली असुन पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन दोन जणाना ताब्यात घेतले आहे . पाहुणेनगर खटकाळी गावठाण येथे रुखसाना ईक्बाल शेख या राहात असुन त्यांनी बचत गटामार्फत कर्जे घेतले होते त्यातील काही महीलांनी कर्ज वेळेवर भरले नाही म्हणून रुखसाना यांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत त्याच परिसरात राहणारे चव्हाण यांना सांगितले त्याचा राग आल्यामुळे या दोन कुटुंबात वाद झाले होते त्यावेळी मोठा जमाव बेलापुर पोलीस स्टेशनला जमा झाला होता त्या वेळी तक्रार देण्यास कुणीही पुढे आले नाही याच गोष्टीचा राग मनात धरुन राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण याने आपल्या चार ते पाच साथीदारा समवेत लाकडी दांडके धारदार हत्यारे कुऱ्हाड घेवुन पहाटे तीनच्या सुमारास रुकसाना शेख यांच्या घरावर हल्ला चढविला घरातील खीडकीच्या काचा फोडण्यात आल्या घराच्या पाठीमागील गेटचा दरवाजा तोडून मागील खीडकीच्या काचाही फोडण्यात आल्या बाथरुमचाही दरवाजा तोडण्यात आला शिलाई मशिन फोडण्याचा प्रयत्न केला तसेच घरासमोर दोन मोटार सायकली लावालेल्या होत्या त्यावर पेट्रोल टाकुन त्या पेटविण्यात आल्या त्यात ज्यूपिटर गाडी नंबर एम एच १७ ९१८३ ही जळून खाक झाली त्या शेजारी उभी असलेल्या स्प्लेंडर मोटार सायकलची मोडतोड करुन ती ही पेटवीण्यात आली होती पोलीसांनी तातडीने ती आग विझवली व दोन्ही वहाने पोलीस स्टेशनला आणली हा प्रकार चालु असतानाच रुक्साना शेख यांचे समोर राहणारे नातेवाईक सुलताना युसुफ पठाण या मदतीकरीता धावल्या असता त्यांच्यावर धारदार शस्राने वार केला त्यामुळे त्या जखमी झाल्या तेथेच राहणारे फिरोज पठाण याने बेलापुर पोलीस स्टेशनला फोन केला अगदी काही वेळेतच बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हाफसे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हरिष पानसंबळ भारत तमनर नंदु लोखंडे हे घटनास्थळी पोहोचले पोलीसांना पहाताच पप्पू चव्हाण शहारुख शेख व त्यांच्या साथीदारांनी पळ काढला पोलीसानी तातडीने शहारुख सांडू शेख व पप्पू उर्फ राजेंद्र भिमा चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले ,पोलीसांनी सुलताना युसुफ पठाण यांच्या फिर्यादीवरुन शहारुख सांडू शेख पप्पू उर्फ राजेंद्र भिमा चव्हाण व इतर आरोपी विरोधात भादवि कलम ३२४,४२७ १४३ ,१४७ ,.१४८ ,१४९ ,४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ऐ पी आय जिवन बोरसे हे करत आहेत.
गावात सर्व धर्मिय गुण्या गोविंदाने राहत असुन काही गुंड बाहेर गावातुन येवुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते खपवुन घेणार नाही गावाची शांतता बिघडविणाऱ्या व्यक्तीचा सर्व ग्रामस्थ मीळून बंदोबस्त करु *जि प सदस्य शरद नवले*