नर्मदा परिक्रमा निमित्त ह.भ.प.कैलासगिरीजी महाराज सावखेडा यांचा किर्तनाचा कार्यक्रम

नर्मदा परिक्रमा निमित्त ह.भ.प.कैलासगिरीजी महाराज सावखेडा यांचा किर्तनाचा कार्यक्रम
आपल्या भारत देशातील अनेक लोक नर्मदा परिक्रमा करत असतात, भारतीय ग्रंथांमध्ये सांगितले गेले की नर्मदा परिक्रमा केल्याने मोक्ष प्राप्त होतो,जीवन बदलते असे विविध नर्मदा परिक्रमा महत्त्व स्पष्ट गेले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील श्री आण्णासाहेब गोपिनाथ दांगट यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असून त्यानिमित्त गुरूवार दि २९/२/२०२४ रोजी गंगापुजन व सकाळी ८ वाजता पाथरे फाटा येथून भव्य मिरवणूक निघणार आहे.
सदर पुढील नियोजित कार्यक्रम हा दिनांक १५ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प.कैलासगिरीजी महाराज सावखेडा यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त भेर्डापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविक- भक्तांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहून किर्तनाचा आस्वाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी दांगट कुटुंबाच्या वतीने नम्र विनंती करण्यात आली आहे.