गेवराई कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी ; विविध समित्यांचे गठण*

*गेवराई कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी ; विविध समित्यांचे गठण*
*स्वागताध्यक्षपदी राजेंद्र मोटे तर कार्याध्यक्षपदी पूजा ताई मोरे*
*20 डिसेंबरपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन*
मराठवाड्यातील शेतकर्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने गेल्या १५ वर्षांपासून किसान कृषि विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय कृषिरत्न गणेशराव बेद्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळात हे प्रदर्शन होऊ न शकल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक २०ते २४ डिसेंबर दरम्यान किसान कृषी महोत्सव या कृषि प्रदर्शनात द्वारे बीड रोड वरील आठ एकर विस्तारणे दसरा मैदानात भव्य अशा ५दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शन जय्यत तयारी सुरू असून या अनुषंगाने विविध समित्यांचे गठन करण्यात आले. स्वागताध्यक्षपदी राजेंद्र मोटे कार्याध्यक्षपदी पूजाताई मोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती कृषी प्रदर्शन आयोजन समितीचे संयोजक कृषिभूषण महेश बेदरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मराठवाड्यातील शेतकर्यांना नवतंत्रज्ञान मिळावे म्हणून येथील किसान कृषी विकास प्रतिष्ठान मराठवाडाभर बीड, जालना, परभणी, हिंगोली सह इतर ठिकाणी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करते २०१९ पासून कोरोना काळामुळे या प्रदर्शनाला खंड पडल्याने व बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आग्रहाने पुन्हा या प्रदर्शनाचे आयोजन स्वर्गीय कृषिरत्न गणेश बेद्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदर्शनाचे आयोजन केले असून प्रकल्प संचालक आत्मा, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, महाएपीएसी फेडरेशन यांचा यात विशेष सहभाग प्रदर्शनात असणार आहे.
कृषी प्रदर्शनात भव्य अशा आठ दालनात द्वारे तब्बल २०० कृषी उत्पादनांची स्टॉल यामध्ये असून कृषी अवजारांची प्रात्यक्षिके या प्रदर्शनात पाहण्यास मिळणार आहे, एकदिवसीय पशुप्रदर्शन तज्ज्ञांची चर्चासत्रे आदी उपक्रम या प्रदर्शनात होणार आहे विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन व समारोप प्रसंगी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा या शेतक यांचा गौरव करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचा गेवराई शहरासह जिल्ह्यातील शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने संयोजक कृषिभूषण महेश बेदरे ,स्वागताध्यक्ष राजेंद्र मोटे , निमंत्रक शिवाजीराव मोटे,कार्याध्यक्ष पुजाताई मोरे, पुरस्कार वितरण समिती प्रमुख राजेंद्र दादा आतकरे,स्वागत समिती प्रमुख सचिन मोटे , मान्यवर स्वागत समिती प्रमुख, शिनू भाऊ बेद्रे, धनंजय बेद्रे , व्यवस्थापन समिती प्रमुख शिवाजी शिंगाडे ,प्रसिद्धी प्रमुख भागवत जाधव,चर्चासत्र समितीप्रमुख सतीश केसभट, व्यवस्थापक समिति बाळासाहेब आतकरे आदींनी केले आहे.
शासनाच्या विना मदतीने होते प्रदर्शन
मराठवाड्यामध्ये कृषी प्रदर्शनाची संकल्पना किसान कृषी विकास प्रतिष्ठानने शेतीकरी हा केंद्रबिंदू म्हणून 2007 पासून मराठवाड्यामध्ये प्रथम एकमेव प्रदर्शनाची सुरुवात केली. जेमतेम कृषी प्रदर्शनामध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला खूप मोठा खर्च होत असतानाही 2007 पासून शेतकऱ्यांसाठी अविरत कृषी प्रदर्शन चालू ठेवले 2013 ते 17 राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून आत्मा अंतर्गत एक ते दीड लाख रुपयांची मदत कृषी प्रदर्शनासाठी मिळायची परंतु 2018 पासून ते 2022 पर्यंत शासनाच्या विना मदतीने हे कृषी प्रदर्शन स्वखर्चातून व काही इतर प्रायोजक कंपन्याच्या सहकार्याने चालू आहे. शासनाने 2018 पासून धोरण बदलून प्रत्येक जिल्ह्याला कृषी प्रदर्शनासाठी तब्बल 20 लाख रुपयांची तरतूद केली असताना देखील कृषी विभागाच्या अधिकारी वर्गाच्या हेकलेखोरपणामुळे व कृषी प्रदर्शनाचा वेगळा हेतू ठेवून पैसे उडवण्याचा राज रोज प्रकार सुरू आहे आयुक्तालय स्तरावरून दिलेल्या अटीनुसार ते हे काम करत असल्याचं असल्याचं बोलले जाते परंतु शासनाच्या या जिल्हा कृषी महोत्सवाची व्यापकता फक्त कागदावरच असून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने कृषी प्रदर्शन करणाऱ्या संस्थांना याचा नाहक त्रास होत आहे तरीसुद्धा या संस्था कृषी प्रदर्शन मोठ्या दिमाखात सातत्याने करत आहेत.