भेर्डापूर मधील एकाचा; याने कापला गळा
भेर्डापूर मधील एकाचा; याने कापला गळा
मकर संक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा आहे.परंतु काही व्यक्ती पतंग उडविण्यासाठी काच पावडर लावलेला मांज्या वापरत असल्याने अनेकांना जीव गमावावा लागत असून त्याचप्रमाणे पक्ष्यांचीही अगदी कत्तल होत असल्याचे दिसून येते.
भेर्डापूर मधील श्री भाऊसाहेब एकनाथ बडाख हे दिनांक १८नोव्हेबरला पुणतांबा येथे आपल्या पुतनीच्या घरी भेटायला गेले होते. ते स्वत: मोटारसायकलने पुणतांब्याहून आपल्या घरी येत असतानाच पुणतांबा परिसरात काही ठराविक अंतरावर दुपारी २:३० वाजता ही घटना घडली आहे.
आपल्या परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. श्री भाऊसाहेब बडाख स्वत: मोटरसायकलवर रस्त्याने एकटेच प्रवास करत होते.
म्हणतात की , “देव तारी त्याला कोण मारी” अगदी तसेच या घटनेत भाऊसाहेब बडाख यांना अनुभव आला आहे.
पुणतांबा परिसरात घटना घडली त्यावेळी पुणतांबा येथील सरपंच व काही नागरिकांच्या मदतीने एका हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले.त्यांच्यावर वेळेवर इलाज करण्यात आले .मांज्याने भयानक गळा कापल्याने अतीशय रक्तस्राव झाला. गळ्याला दहा टाके पडले ,हाताला मांज्याने अनेक ठिकाणी कापले असून हाताला तीन टाके पडले आहे.
परिणामी अशा घटना भविष्यात घडणार नाहीत.
तसेच पतंगाच्या मांज्याला काच पावडर असल्याने हवेत उडणारे पक्ष्यांचीही मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे.
बाजारात किंवा दुकानात पतंगाचा मांज्या विक्रीसाठी असेल तर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.