पंधरा दिवसात नऊ अपघात 14 जन जखमी वाहनांचे मोठे नुकसान

पंधरा दिवसात नऊ अपघात 14 जन जखमी वाहनांचे मोठे नुकसान
टाकळीभान येथे राज्य मार्ग 44 डिव्हायडर रिफ्लेक्टर नसल्याने पंधरा दिवसात नऊ अपघात अनेक बचावले 14 जण जखमी जखमी वाहनांचे मोठी नुकसान सार्वजनिक बांधकाम खाते अजून किती अपघात होऊन देणार आता तरी जागी येऊ द्या!
टाकळीभान परिसर मध्ये रोड रुंद चांगला झाल्याने, वाहनांची गती वाढली आहे. टाकळीभान गावातील नेवासा रोडच्या बाजूने वाहने येताना सुरुवातीला दुभाजकाची सुरुवात होते त्या ठिकाणी रात्री ते दुभाजक न दिसल्याने त्यावर गाड्या आदळून नऊ अपघात झालेले आहेत, यामध्ये वाहनांचे नुकसान होऊन काही इसम जखमी ही झाले आहेत, डिव्हायडर झाले परंतु त्या ठिकाणी दुभाजक सुरू होणार असल्याची कल्पना रात्री वाहन चालकांना येत नसून वाहने दुभाजक वर आदळत आहेत, त्या ठिकाणी सूचित सार्वजनिक बांधकाम विभागाने रिफ्लेक्टर बसवणे आत्य आवश्यक व गरजेचे आहे, तरच वाहन चालकाला दुभाजक सुरुवातीची सूचना मिळून ते सावध होऊ शकतात. या ठिकाणी काही दिवसापूर्वी ट्रक आढळला होता, तर मागील आठवड्यात मारुती कार डिव्हायडरला आदळली सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही म्हणून दैव बलवत्तर म्हणून वाहन चालक बचावले. या ठिकाणी रोड मोठा रुंद व चांगला झाल्याने वाहने वेगात असतात, त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो,तरी सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याने त्वरित रिफ्लेक्टर बसवावे अशी मागणी टाकळीभान ग्रामस्थांनी केली आहे.