मुख्य रस्त्यावरील लोंबकळणा-या तारांचा ग्रामस्थांच्या जिवीतास धोका, जीव गेल्यावरच महावितरण दुरुस्ती करणार का??*

*मुख्य रस्त्यावरील लोंबकळणा-या तारांचा ग्रामस्थांच्या जिवीतास धोका, जीव गेल्यावरच महावितरण दुरुस्ती करणार का??*
बीड तालुक्यातील मौजे.बेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत बेलगाव वस्तिवरील मुख्य रस्त्यावरील दोन पोल तुटल्याने विद्युत तारा लोंबकळत असुन वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसाळ्यात दुर्घटना घडु नये यासाठी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी कार्यकारी अभियंता महावितरण व सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय लिंबागणेश यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अडीच महिन्यांपासून तारा लोंबकळत आहेत, तक्रार करूनही दखल नाही:- अशोक जाधव (सरपंच बेलगाव)
बेलगाव वस्ति येथील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर गेल्या अडीच महिन्यांपासून २ पोल तुटलेले असुन तारा लोंबकळत आहेत, महावितरण कर्मचारी यांना सांगितले तरी लक्ष देत नाहीत, नुसतंच करु म्हणतेत.
आजच लाईनमनला दुरुस्ती करायला सांगतो:- विजय हालकुडे (सहाय्यक अभियंता महावितरण लिंबागणेश)
डॉ.गणेश ढवळे यांनी फोनवरून सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय लिंबागणेश यांना बेलगाववस्ती वरील लोंबकळणा-या तारांची कल्पना देऊन तातडीने दुरुस्ती करण्याची विनंती केली असता आजच सुरवसे लाईनमन यांना सांगुन दूरूस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले.