महाराष्ट्र
राहुरी खुर्द च्या तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी निसारभाई शेख

राहुरी खुर्द च्या तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी निसारभाई शेख
राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द गावच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी राहुरी खुर्द चे मा, उपसरपंच निसारभाई ईमाम शेख अध्यक्ष यांची निवड करण्यात आली. राहुरी खुर्द गावचे सरपंच सौ,मालतीताई साखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. राहुरी खुर्द येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदाची निवड नुकतीच पार पडली. यावेळी उपसरपंच तुकाराम बाचकर, ज्येष्ठ नेते गेणूभाऊ तोडमल, मा, सरपंच ईमामभाई शेख, नंदकुमार डोळस, मधुकर साळवे, आयुबभाई पठाण, रफीकभाई शेख, उमेश बाचकर, आण्णासाहेब बाचकर, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण यावेळी उपस्थित होते.