आळंदीकर मुस्लिमांना सिद्धार्थ ग्रुप च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन*

*आळंदीकर मुस्लिमांना सिद्धार्थ ग्रुप च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन*
आळंदी देवाची येथील सिद्धार्थ ग्रुप यांनी सर्व मुस्लिम बांधवांना जातीय सलोखा जपत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते आळंदीकर मुस्लिमांसाठी सिद्धार्थ ग्रुपच्या वतीने सलग हे पाच वर्ष इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात असून. यामध्ये समाजात एकता समतेचा संदेश जावा यासाठी कार्यरत असणाऱ्या सिद्धार्थ ग्रुपच्या वतीने सदर आयोजन करण्यात आले होते. जातीय सलोखा जपला जावा यासाठी सिद्धार्थ ग्रुपची ही कामगिरी कौतुकास्पद आहे आळंदीकर मुस्लिम बांधवांनी यासाठी सर्व भीमसैनिकांचे आभार मानले.रमजान रोजे हे वेळे चे तंतोतंत नियम पाळून केलें जातात. रोजे ची वेळ पाळली नाही तर तो उपवास होत नाही. म्हणून रमजान रोजे पकडताना आणि रोजे सोडताना. सेकंद मिनिट गणले जातात. वेळ घालवून रोजा सोडणे अथवा पकडणे मुस्लिम धर्मात पाप मानले गेले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व भीम सैनिक यामध्ये रवींद्र रंधवे. अक्षय रंधवे. विश्वजीत थोरात .योगेश रंधवे. राजेंद्र रंधवे. राहुल रणदिवे. निखिल रणदिवे. हर्षल थोरात अनिकेत गायकवाड.पोर्णिमा रंधवे. ऋतुजा रंधवे. वैष्णवी रंधवे स्वरूपा पाटोळे. तृप्ती थोरात. ज्ञानेश्वर बनसोडे.जालिंदर जाधव (आळंदी पोलीस) यांची उपस्थिती होती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाच अनुकरण करत सदर इफ्तार पार्टी केल्याबद्दल मुस्लिम धर्मियांच्या वतीने त्यांचे आळंदी शहर मुस्लिम समाजाकडून आभार मानण्यात आले आहे