*डाॅ.सुरेश साबळे.. प्रभारी ते पुर्णवेळ जिल्हाशल्यचिकित्सक घेतला पदभार*

*डाॅ.सुरेश साबळे.. प्रभारी ते पुर्णवेळ जिल्हाशल्यचिकित्सक घेतला पदभार*
डाॅ.सुरेश साबळे यांची दीड वर्षापुर्वी प्रभारी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अनागोंदी कारभार असलेल्या जिल्हारूग्णालयात सुधारण्याचे संकेत दिसु लागले तसे जाणीवपुर्वक प्रयत्न डाॅ.सुरेश साबळे यांनी केले,गोरगरीब रूग्णांच्या मदतीस धावणारे मुक्त पत्रकार संतोष ढाकणे,संभाजी सुर्वे ,मनोज जाधव ही झाली प्रातिनिधिक स्वरूपात बाकी ईतर अनेक सामाजिक काम करणारांना डाॅ.सुरेश साबळे यांच्या कामाविषयी तळमळीविषयी आपुलकी वाटु लागली. त्यांनी केलेल्या कामांची विविध दैनिकातुन भलावण होऊ लागली अर्थातच त्या सोबत रूग्णालयातील व्यवस्थापन बाबातीत काही तक्रारी सुद्धा होत्या आणि आजही आहेत परंतु तक्रारीची दखल घेऊन आधिकार क्षेत्रात येत असल्याप्रमाणे काही हालचाली केल्याचे दिसून आले हे मात्र नक्की..
बीडकरांना डाॅ.सुरेश साबळे का भावले??? काय नाही यापेक्षा आहे त्यातुनच मार्ग काढु हा सकारात्मक विचार डाॅ.सुरेश सुरेश साबळेंचा बीडकरांना डाॅ.सुरेश साबळे भावण्याचं कारण म्हणजे काय नाही यापेक्षा काय आहे त्यातुन मार्ग काढुया असा सकारात्मक विचार डाॅ.सुरेश साबळे यांच्यापाशी होता. जिल्हा रूग्णालयातील अनागोंदी कारभार दुर करण्यासह ट्युमर सारख्या गंभीर शस्त्रक्रियासह ईतर शस्त्रक्रियांचा टक्का वाढवुन कोरोनाच्या दुस-या लाटेत उपचारांचे नियोजन,२ डी ईको,लॅपरोस्कोपिक व लेझर ऑपरेशनस,कॅन्सर थेरपी युनिट,एन्डोस्कोपी आदि अद्यायावत आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध केल्या त्याचबरोबर हाडाचा विभाग,कान नाक घसा आदि. शस्त्रक्रिया सुरू केल्या प्रसुतीची संख्या ३ पट वाढवुन कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आले.
जिल्हारुग्णालयाचा कायापालट करून सर्वसामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्यात यशस्वी झाले. त्यामुळेच डाॅ.सुरेश साबळे यांच्याविषयी बीडकरांच्या मनात आपुलकी प्रेम निर्माण झाले.
जनआंदोलन…उत्स्फूर्त सत्ताधारी- विरोधक-सर्वपक्षीय ..
दि.७ ऑगस्ट रोजी डाॅ.सुरेश साबळे यांच्या ठीकाणी डाॅ.सतिश सुर्यवंशी यांच्या नियुक्तिचे आदेश निघाल्यानंतर आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी जनआंदोलनाची हाक दिली त्यात मी,मुक्तपत्रकार संतोष ढाकणे,सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे आदिंनी आंदोलनाचे आवाहन केले आणि दि.१० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यात प्रामुख्याने सर्व राजकीय पक्ष,सामजिक संघटनांचे तसेच पत्रकार सहभागी झाले होते. त्यात शेख युनुस च-हाटकर,रामनाथ खोड, राहुल कवठेकर,शेख मुबीन,सय्यद आबेद,सुनिल सुरवसे, शफीक भाऊ,अशोक लोढा, अमर नाईकवाडे,फारूक पटेल,शिवराज बांगर,बाळासाहेब मस्के,संदिप उबाळे,किरण भोसले,खुर्शीद आलम,बाबासाहेब बागलाने,शिवाजी भोसेकर,शेख मतीन,पिनु शेनकुडे,सखाराम देवकर,आबासाहेब नरवडे,लक्ष्मण राऊत,राम साळवे,प्रा. विद्या जाधव,पत्रकार भागवत तावरे,संतोष मानुरकर,वसंत मुंढे आदि सहभागी होते.(फक्त निवेदनावरील स्वाक्षरी करणारांची वरील नावे आहेत) ईतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनी निर्णय घेतल्यानंतर पुढील सुत्रे हालली आणि डाॅ.सुरेश साबळे यांचे प्रभारी जिल्हाशल्यचिकित्सक पद कायम ठेवण्यात आले. याचवेळी सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेते यांनी वरीष्ठ स्तरावरून मंत्रालयातून हालचाल केली आणि अखेर दि.२१ ऑक्टोबर २०२२ रोजी ….प्रभारी पदी असमारे जिल्हाशल्यचिकित्सक पदी पुर्णवेळ जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड म्हणून डाॅ.सुरेश साबळे यांची नियुक्ति करण्यात आली. एकंदरीत सर्वच बीडकरांचे प्रयत्न कामी आले आणि डाॅ.सुरेश साबळे यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढली ती तितक्याच ताकदीने आणि प्रामाणिक पणे पार पाडतिल अशी आशा करूयात….