पांढऱ्या सोन्याचे दर 2 हजारावर, कुठे गेले 10,15,20 हजारा वाले.

पांढऱ्या सोन्याचे दर 2 हजारावर, कुठे गेले 10,15,20 हजारा वाले.
राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये एन दिवाळी सणाच्या वेळेस शेतकऱ्यांची हेडळणा केल्यासारख्या कापसाचा दर चक्क दोन हजार रुपये सांगितला जातो व शेतकऱ्यांची अडवणूक करून कापूस खरेदी केला जात आहे. एक महिन्यापूर्वी कापूस खरेदी केंद्राचे जोमात उद्घाटन करण्यात आली त्यावेळेस कोणी 10000 हजार तर कोणी 15000 तर कोणी 21000 रुपये खरेदी करत आहे अशा पद्धतीने सोशल मीडियावर बिले देखील टाकण्यात आली. परंतु वास्तविक पाहता शेतकऱ्याची डोळ्यात माती फेकली गेली आज शेतकऱ्याचा कापूस घेऊन गेल्यानंतर खरेदी करणारे सांगतात की आम्ही कापूस घेणे बंद केले आहे. दुकाने उघडी असतात परंतु कापूस घेण्यास नकार दिला जातो शेतकऱ्यांकडे विलाज नाही मजुराचे पैसे देणे असते तसेच ऐन सणासुदीच्या काळामध्ये घरामध्ये लहान मुलांना कपडे तसेच किराणा खरेदी करणे आहे.उसनवारी देणे तगादा चालू आहे. म्हणून शेतकरी कापूस खरेदी करणाऱ्या कडे विनवणी केली जात आहे त्याच वेळेस शेतकऱ्याचा कापूस 2 ते 3 हजार रुपये ने खरेदी केला जातोय त्यावेळेस शेतकरी मात्र पूर्ण लूटला जात आहे. एक तर निसर्ग राजा शेतकऱ्यावर कोपला आहे दुसरीकडून व्यापाऱ्यांकड्वे शेतकऱ्यांची लोचकी तोडली जात आहे. हे सर्व होत असताना मात्र शासकीय यंत्रणा स्वस्त झालेली दिसून येत आहे. कापसाला जर दोन हजार रुपये भाव मिळाला तर वेचणीसाठी मजुराला 1000 ते 1200 द्यावा लागत आहे म्हणजे शेतकऱ्याचा पदरात 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल येत आहे. शासकीय यंत्रणेने यावर वेळीच अंकुश आणण्याची गरज आहे.
अन्यथा शेतकरी राजाचा तीव्र उद्रेक प्रशासकीय यंत्रणेला सहन करावा लागणार आहे असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
उसनवारीने पैसे घेऊन कपाशी सोयाबीन लावलेली आहे अति पावसामुळे पिकाचे होते की नव्हते झाले आहे प्रशासनाने 50000 कागदाचे पूर्तता करून घेण्याचे ठरवले अगोदर ई- पिक पाहनी यानंतर पंचनामा नंतर पीक वाया गेलेला शेतकरी पिकांमध्ये उभा करून विकासमवेत फोटो त्यानंतर सर्व कागद जमा करायला गेल्यावर काळी आई पट्टी (जमीन कर) भरून घेतल सर्व पूर्तता करण्यासाठी अगोदर खिशातून 500 रुपये खर्च झाले अजून मदत नाही काहीच नाही थोडेफार कापूस वेचून घेतला कापूस विकण्यासाठी गेलो तर 2000 हजार ते 2200 रुपये क्विंटल मागतला वेचणीसाठी बाराशे रुपये क्विंटल खर्च आला पदरात 800 ते 1000 रुपये आले हे सर्व सत्य कहानी आहे.
कापूस उत्पादक
फक्त शेतकऱ्याच्या नावाने योजना येतात सर्व शेतकऱ्यांसाठीच आहे असे भासवले जाते परंतु शेतकरी आजही एक टाइम उपाशीच आहे घरातील लहान मुले दिवाळी सणानिमित्त काही खरेदी करण्यासाठी मागतात तर माझा शेतकरी राजा शेतामध्ये जाऊन एकांतात रडताना दिसत आहे शेतकरी राजा जर म्हणायचे असेल तर शेतकऱ्याला भीक नको आहे तुमची अनुदान नको आहे फक्त काढणीला आलेल्या पिकाला हमीभाव पाहिजे कापसामध्ये होत असलेली पीळवणूक थांबेल की नाही, आता येणाऱ्या काळातच समजेल याबाबत कृषी अधिकारी तसेच इतर शासकीय यंत्रणा कृषिमंत्री काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
आम्ही खरेदी केलेला कापूस उचलला जात नसल्याने आम्ही कापूस खरेदी करत नाही.
कापूस खरेदी करणारा व्यापारी