
*महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील यांची माऊलींच्या मंदिराला सहकुटुंब सदिच्छा भेट*
आळंदी देवाची( दि, 26 )महाराष्ट्र राज्य चे माजी गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आज कुटुंबासह श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात सदिच्छा भेट दिली सकाळी नियोजित कार्यक्रम आटवून नामदारांनी माऊलींच्या मंदिरात भेट दिली त्याप्रसंगी विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील तसेच विश्वस्त डॉ,अभय टिळक यांच्या वतीने व सहकुटुंबाचा शाल श्रीफळ व ज्ञानेश्वर महाराज चरित्र देऊन त्यांना ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे वतीने सन्मानित करण्यात आले, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब अरफळकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी डी, डी ,भोसले पाटील ,माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटिल, माजी नगरसेवक श्रीधर कुऱ्हाडे पाटील, रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप रणदिवे, पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ पप्पू कुऱ्हाडे, ह.भ. प. गोविंद महाराज गोरे,युवा कार्यकर्ते प्रसाद बोराडे ,याप्रसंगी उपस्थित होते नामदार वळसे पाटील साहेबांना देवस्थानची माहिती देताना प्रदेश प्रतिनिधी भोसले पाटील यांनी संस्थांनची असलेली जुनी घटना तसेच देवस्थान यापूर्वी आळंदी शहरात कुठलाही खर्च न करता फक्त देवस्थान अंतर्गत खर्च करत असल्याची माहिती दिली परंतु ॲड ,विकास ढगे आणि डॉ, अभय टिळक यांच्या विश्वस्त झाल्यानंतर त्यांनी सदर परंपरा मोडीत काढून आळंदीच्या इतर विकास कामातही देवस्थानचा हातभार लावल्याची उल्लेखनीय बाब नामदार वळसे पाटील साहेब यांना निदर्शनास आणून दिली यादरम्यान आळंदी नगरीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील यांच्या ऑफिसला सदिच्छा भेट दिली आहे,तसेच कुटुंबीयांनीही बबनराव कुऱ्हाडे पाटील यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपुस केली, नामदार वळसे पाटील साहेब सदर ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मी माऊलींच्या चरणी लीन होण्यासाठी आलेलो आहे आणि मला राजकीय गप्पा नकोत अशी इच्छा व्यक्त केली,