आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजन
भेर्डापूरचे कन्यारत्न राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक-

भेर्डापूरचे कन्यारत्न राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक- कु.योगिता दिपक कसबे.
मा.रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील श्री दिपक योकोब कसबे यांची कन्या कुमारी योगिता दिपक कसबे हिचा अहमदनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला आहे.तसेच पंधरा हजार रुपये रोख स्वरूपात बक्षिस व स्मृतिचिन्ह मिळवले आहे. योगिता ही अशोक ग्रामिण ए. सी. एस काॅलेजची एक हुशार गुणवंत विद्यार्थ्यीनी असून सर्वसामान्य कुटुंबातील आहे. कुमारी योगिता हिने नाविन्यपूर्ण यश संपादन केल्या बद्दल तीचे भेर्डापूर ग्रामस्थांकडून तसेच अशोक कारखान्याचे विद्यमान संचालक शिवभक्त प्रफुल्ल बाळासाहेब दांगट पाटील यांनीही विशेष कौतुक केले आहे. कुमारी योगिता हिच्या उज्वल भवितव्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.