ध्वजारोहणाद्वारे 74 व्या मतमाऊली यात्रा उत्सवाच्या शुभारंभ

ध्वजारोहणाद्वारे 74 व्या मतमाऊली यात्रा उत्सवाच्या शुभारंभ
टाकळीभान प्रतिनिधी — हरेगाव येथे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत तेरेजा चर्च मत माऊली भक्ती स्थान अर्थात पवित्र मारीया येशू ख्रिस्ताची आईचा जन्मोत्सव साजरा करण्यापूर्वी ध्वजारोहणाद्वारे यात्रा उत्सवाला नाशिक कॅथलिक धर्मप्रांताचे महागुरुस्वामी डाँ.लुड्स डँनिएल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी महागुरुस्वामी डाँ.लुड्स डँनिएल
देवा पुढे मी पणा चालत नाही. लीन व नम्र लोंकाना देवाचा आर्शिवाद मिळतो. पवित्र मारीया देवाची आई असतांना देखील लीन, नम्र झाली. पवित्र मारीयाचा जन्मोत्सव साजरा करीत असताना आपण प्रत्येकाने लीन व नम्र व्हावे असा संदेश त्यांनी दिला.
सुरुवातीस रथामध्ये पवित्र मारीयाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.१० सप्टेंबर रोजी पवित्र मारीया अर्थात मतमाउली चा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.त्या पूर्वी नऊ दिवस विशेष नोव्हेना भक्तीचे , प्रार्थनेचे आयोजन केले जाते.