श्री क्षेत्र गणेशखिंड येथे बुधवार पासून वरद गजानन उत्सव सोहळ्याचे आयोजन.

श्री क्षेत्र गणेशखिंड येथे बुधवार पासून वरद गजानन उत्सव सोहळ्याचे आयोजन.
श्रीरामपूर तालुक्यातील भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असणारे वरद विनायक मंदीर श्री क्षेत्र गणेशखिंड येथे बुधवार दि.३१ आॅगस्ट रोजी गणेश चतृर्थीच्या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात होणार असल्याचे श्री गणेश देवस्थान ट्रस्ट च्या वतीने सांगण्यात आले आहे.
महंत परमपुज्य गुरूवर्य ह.भ.प.शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांचे कृपाशिर्वादाने भागवताचार्य ह.भ.प.प्रकाशनंदगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली व ह.भ.प.किसन महाराज पवार मुकूंदराज स्वामी संस्थान, आंबेजोगाई, ह.भ.प संतोष महाराज चौधरी श्री क्षेत्र हनुमान गड गुजरवाडी, ह.भ.प.संदीप महाराज जाधव कारवाडी आश्रम, ह.भ.प.कृष्णा महाराज वाघुले देवाची आळंदी यांच्या अधिपत्याखाली वरद गजानन उत्सव सोहळा ग्रथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे (वर्ष ३८) आयोजन करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र गणेशखिंड ता.श्रीरामपूर येथे बुधवार दि.३१ आॅगस्ट ते शुक्रवार दि.९ सप्टेंबर पर्यंत सुरू असणार्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सप्ताहाच्या पहील्या दिवशीसकाळी ६ वा. अखंड ज्योत प्रज्वलन व महापुजा आरंभ, ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी ७ वाजता, गणेश यात्रा सकाळी ८ वाजता व गणेश महाआरती रोज सकाळी ७ व सायं.७ वा. असणार आहे. या सप्ताहातील दैनंदीन कार्यक्रमात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ७.३० ते १०.३०, भजन दु.१ ते ३, किर्तन दु.३ ते ५, हरिपाठ सायं.५ ते ६ या प्रमाणे धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार दि.९ सप्टेंबर रोजी (अनंत चतुर्दशी) रोजी सकाळी ९ वा. महंत प.पु.गुरूवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होवून या सप्ताहाची सांगता होणार असल्याचे सांगून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहुन आनंद द्विगुणीत करावा. असे आवाहन श्री गणेश देवस्थान ट्रस्ट गणेशखिंड परिसर, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ गणेशखिंड यांच्या वतीने करण्यात आले आहे.