गुन्हेगारी

परिसरात दहशत पसरविण्यासाठी विधवा महीलेचे घर पेट्रोला टाकुन पेटविले.

परिसरात दहशत पसरविण्यासाठी विधवा महीलेचे घर पेट्रोला टाकुन पेटविले.

 

बेलापूरः(प्रतिनिधी )- येथील खटकाळी गावठाण येथे आपापसातील वादातुन झालेल्या भांडणातुन दहशत माजविण्याचा प्रकार समोर आलाअसुन यात एका विधवेचे घर पेट्रोल टाकुन जाळण्यात आले तसेच जाळपोळ,व वाहनांची मोडतोड असा प्रकार घडला.तथापि या घटनेचा बोभाटा झाला असला तरी त्या व्यक्तीच्या आसलेल्या दहशतीमुळे फिर्याद देण्यास कोणीच पुढे धजावत नसले तरी पोलीसांनी या प्रकरणी फिर्यादी होवुन गावात दहशत माजविणार्याला धडा शिकवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे याबाबतचा समजलेली हकीकत अशी की ,खटकाळी गावठाण येथे एक विधवा आपल्या तीन मुलासह रहाते तिचे शेजारी आसणाऱ्या सराईत गुन्हेगाराने गोंधळ घालुन तिला शिवीगाळ केली .त्याच्या धाकाने ती श्रीरामपुर येथील नातेवाईकाकडे राहण्यास गेली असता त्या व्यक्तीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला पेट्रोल टाकुन घरातील सर्व संसारपयोगी सामान पेटवुन दिले तसेच त्या परिसरात दहशत निर्माण केली त्याच्या दहशतीमुळे अनेक जण घाबरले आहेत. काही दिवसापुर्वी अशाच प्रकारे दहशत करुन काही मोटारसायकली तसेच घरातील सामान पेट्रोल टाकुन जाळले होते त्या बाबत बेलापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे . येथे कायम गुन्हेगारांचा वावर असल्यामुळे लहानमोठ्या तक्रारी होत आहेत .तसेच काही तडीपार गुंडही येथे राजरोसपणे आश्रय घेतात.याचाच परिणाम म्हणून काल सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा परिसरात दहशत बसविण्यासाठी पेट्रोल टाकुन त्या गरीब विधवेचे संसारपयोगी सामान जाळण्यात आले आहे. आज दिवसभर या घटनेची चर्चा होत होती. पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट दिली परंतु ती विधवा प्रचंड दहशतीखाली आसल्यामुळे तक्रार देण्यास पुढे आली नाही .असे प्रकार पुन्हा पुन्हा होत राहीले तर भविष्यात एखादी गंभीर घटना घडू शकते तरी पोलीसांनी वेळीच दखल घेवुन संबधीतावर कठोर कारवाई करावी अशी परिसरातील नागरीकांची मागणी आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे