टाकळीभान येथे भाजपाच्या वतीने असंघटतीत कामगारांना ई श्रम कार्ड वाटप.

टाकळीभान येथे भाजपाच्या वतीने असंघटतीत कामगारांना ई श्रम कार्ड वाटप.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील भाजपाच्या वतीने ग्रामपंचायतच्या स्व. गोविंदराव आदिक सभागृहात असंघटीत कामगारांना ई श्रम कार्ड वाटप भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार होते.तर प्रमुख पाहूणे म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुनिल वाणी, भाजपा महिला आघाडी सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, प्रफुल्ल डावरे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी सभापती नानासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले. तर भाजपाचे मुकुंद हापसे, नारायण काळे यांनी ई श्रम कार्ड योजना व इतर योजनेबाबत माहिती विशद केली.
यावेळी वैशाली चव्हाण, आर पी आयचे आबासाहेब रणनवरे, शिवा साठे, ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव, भाजपाचे ृऋषिकेश हापसे, अनिल दाभाडे, सचिन बनकर, संजय पवार, गोविंद रणनवरे, पप्पू रणनवरे आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथे भाजपाच्या वतीने असंघटीत कामगारांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा सरचिटणीस सुनिल वाणी, महिला आघाडी रसचिटणीस सुप्रिया धुमाळ, माजी सभापती नानासाहेब पवार, प्रफुल्ल डावरे, नारायण काळे, मुकुंद हापसे आदी.