पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयात पहिल्या विद्यार्थी परिषदेची स्थापना

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयात पहिल्या विद्यार्थी
परिषदेची स्थापना
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव या महाविद्यालयात पहिल्या विद्यार्थी परिषदेची स्थापना आज करण्यात आली. या पहिल्या विद्यार्थी परिषदेच्या चेअरमनपदी महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी कु. मयुरी गुंजाळ हिची निवड करण्यात आली.
विद्यार्थी परिषदेमध्ये प्रतिनिधी पदी तिसऱ्या वर्षाचे गोविंद भराड, वैष्णवी कासार, वैभव पवार, शिवम विरकर, दुसऱ्या वर्षाचे अमेय बागळे, श्रद्धा जगताप, संचिता नवले, अश्रफअली शेख, सोनाली धुळगंड तसेच प्रथम वर्षाचे एकता देशमुख, अक्षता जामदार, हर्षदा पाटील व अदिती साळुंखे यांची निवड झाली.
या सर्व निवडी गुणवत्तेवर करण्यात आल्या. स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा प्रतिनिधीपदी अनुक्रमे महेश जाधव व अजिंक्य साबळे यांची निवड झाली. विद्यार्थी परिषदेच्या चेअरमन व सदस्य पदी निवड झालेल्या सर्वांचे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष डॉ.मिलिंद आहिरे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व विद्यार्थी परिषदेची जबाबदारी व कामे यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थी परिषदेच्या उपाध्यक्षपदी डॉ. चारुदत्त चौधरी, सहयोगी प्राध्यापक यांची निवड करण्यात आली.
पहिल्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यानी मोलाचे योगदान दिले. या बैठकीसाठी पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजय कुमार पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री एकनाथ बांगर उपस्थित होते.