गुन्हेगारी
टाकळीभान येथे घटनेच्या निषेर्धात कडक बंद.

टाकळीभान येथे घटनेच्या निषेर्धात कडक बंद.
टाकळीभान येथे नूकत्याच झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरूवार दि.१७ रोजी व्याफारी व ग्रामस्थांच्या वतीने गावबंद पुकारण्यात आला.
टाकळीभान येथे दोन दिवसापुर्वी बबलू बनकर नामक तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने गावामध्ये तणावपुर्ण वातावरण तयार झाले होते. या हल्ल्याचा निषैध नोंदविण्यासाठी व्यापार्यांची बैठक नूकतीच पार पडली. सदर बैठकीत या हल्लेखोरावर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी व घटनेच्या निषेध करण्यासाठी गावबंद करण्याचे ठरले.
त्यानूसार दि.१७ रोजी टाकळीभान मधील व्यापारी व ग्रामस्थांनी कडक बंद पाळत आपआपले व्यवसाय बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध नोंदविला.
जखमीचा जबब घेण्यासाठ पोलीस कर्मचारी हॉस्पिटल मध्ये गेले आहे, जबाब झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल , पोलीस आरोपीचा शोध घेत आहे – पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी माहिती दिली.