गुन्हेगारी
* येथे चक्क पोल्ट्री फार्म मध्ये 244 कोंबड्यांची चोरी*

* येथे चक्क पोल्ट्री फार्म मध्ये 244 कोंबड्यांची चोरी*
बीड गेवराई या रोडवर असणारे संतोष आंधळे यांचे पोल्ट्री फार्म मध्ये रात्री जाळी तोडून 244 कोंबड्यांची चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून जवळपास 85 हजार एवढी किंमत या कोंबड्यांची सांगितली जात आहे. त्यामुळे या पोल्ट्री फार्म चे मालक संतोष आंधळे यांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित पोल्ट्री फार्म हे जयेश पेट्रोल पंपासमोर आहे.