कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे ह्यासाठी सभापती अरुण तनपुरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी प्रदर्शन भरवून एक चांगला उपक्रम हाती घेतला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचा काम राज्यात आदर्शवत असल्याचे गौरोवदगार माजी आमदार चंद्रशेखर कदम ह्यांनी काढले.
श्री चंद्रशेखर कदम हे बाजार समितीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभ तसेच प्रदर्शना निमित्त तालुक्यातील उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट गोपालक, उत्कृष्ट संस्था, व उत्कृष्ट ग्रामपंचायत व उत्कृष्ट उद्योजक ह्यांचे सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार प्रसाद तनपुरे होते. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते कॉ. गंगाधर जाधव माजी सभापती भास्कर काळनर, भानुदास नवले, वाबळे इव्हेटचे अजय वाबळे, युवा नेते हर्ष तनपुरे उपस्थित होते.
श्री कदम आपल्या भाषणात म्हणाले की शेतकऱ्यांनी शेती करताना शेतमालाचे नियोजन केले पाहिजे.माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे शेतीसाठी ड्रीप चा वापर केला पाहिजे हे जरी खरे असले तरी आज ड्रीपसाठी जो खर्च येतो तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही. हा खर्च शासनाने कमी करावा व ड्रीपसाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव कमी केले पाहिजे. तसेच शासनाने शेतमालाचे भावाबाबत योग्य निर्णय घेऊन शेतीमालाचा उत्पादन खर्च व बाजारभाव ह्याची सांगड घालून शेतकऱ्याला परवडेल असे भाव मिळाले पाहिजे असे श्री कदम म्हणाले.
श्री कदम म्हणाले कृषी उत्पन्न बाजार समितीने तालुक्यातील सोनगाव वांबोरी व देवळाली प्रवरा येथे उपबाजार असल्याचे सांगितले पण देवळाली प्रवरा येथील बाजार जर सुरु केला नसेल तर तो सुरु करण्याची मागणी देवळालकरांचे वतीने सभापती अरुण तनपुरे ह्यांचेकडे केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यानी आपल्या भाषणात बाजार समितीने गेली 3 दिवस भरविलेल्या शरद कृषी प्रदर्शनास शेतकरी व्यापारी बचत गट व नागरिकांनी जो प्रतिसाद दिला ते पाहून बाजार समितीने पुढील वर्षी प्रदर्शन भरविण्याची तयारी आत्तापासून सुरु करावी. ह्या प्रदर्शनामुळे ह्या सर्वांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजार समितीने ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने तालुक्यातील उत्कृष्ट संस्था उत्कृष्ठ गोपालक उत्कृष्ठ शेतकरी महिला शेतकरी ह्यांचा सन्मान करून चांगला पायंडा हाती घेतला आहे.
श्री तनपुरे म्हणाले की भविष्यात पाण्यावरून संघर्ष अटळ आहे त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. ज्या वेळी मुळा धरणाची निर्मिती झाली तेव्हा शेतीसाठी 20500 टीएम मसी पाणी उपलब्ध होते तेच आज 13000 टीएमसी पाणी उपलब्ध असून आता पाण्याचा प्राधान्य क्रम बदलला आहे पहिले पिण्यासाठी दुसरे उद्योगासाठी मग तिसरे प्राधान्य शेतीला असल्याने भविष्यात पाण्याच्या प्रत्येक थेबाचा शेतीसाठी वापर करून शेतीचे उत्पन्न वाढविले पाहिजे. पाण्याबरोबर शेतीचे आरोग्य महत्वाचे असून अती पाणी अती रासायनिक खताचा वापर ह्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता कमी होऊन शेत जमीनी नापिक होत चालल्या असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक सभापती अरुण तनपुरे ह्यांनी केले.
प्रदर्शना निमित्त तालुक्यातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांचा सन्मान चिन्ह शाल देऊन सत्कार केला त्यात 1)आदर्श ग्रामपंचायत गणेगांव,सरपंच अमोल भनगडे कुरणवाडी सरपंच सौं कृष्णाबाई खिलारी , सडे सरपंच चंद्रकांत पानसंबळ 2)आदर्श सेवा संस्था, प्रसाद सेवा संस्था चिखलठाण, दत्तात्रय सेवा संस्था वळण, व बागायत पीक सेवा संस्था देवळाली प्रवरा 3)आदर्श प्रगतशील शेतकरी, श्रीमती सुलोचना चांगदेव चव्हाण,(देवळाली प्रवरा )नामदेव तुकाराम गायकवाड (देवळाली प्रवरा )पोपटराव रामचंद्र तनपुरे (राहुरी )श्रीमती हौसाबाई जानकु विटनोर (मांजरी )बाळासाहेब देवराम पाटील (वांबोरी ) व मयूर मदन कुलकर्णी (मुसळवाडी )4)आदर्श गोपालक, गजानन भागवत सातभाई,(राहुरी )रखमाजी बन्सी जाधव (पाथरे )अजित ज्ञानदेव तारडे (ब्राम्हणी ) 5)आदर्श उद्योजक श्रीमती संगीता काशिनाथ तोंडे (फळ प्रक्रिया उद्योग ), केशव रघुनाथ पुंड (दूध प्रक्रिया )सौरभ कदम व प्रसाद देशमुख (शेती औजार उद्योजक ) 6)फार्म प्रोड्यूसर कंपनी ग्रीनअप फार्मर्स (ब्राम्हणी ), मुळा प्रवरा अग्रोटेक (राहुरी )कृषिवेध अग्रो फार्मर्स (राहुरी ) आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला बाजार समितीचे सर्व संचालक नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक विविध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.मनोगत अजय वाबळे प्रसाद देशमुख ह्यांनी व्यक्त केले.संचालक दत्तात्रय खुळे ह्यांनी आभार तर सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे ह्यांनी केले.
फोटो उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देताना माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी आमदार चंद्रशेखर कदम सभापती अरुण तनपुरे गंगाधर जाधव भानुदास नवले भास्कर काळनर दत्तात्रय कवाणे आदि.