Rahuri इलेक्ट्रिक मोटार व 30 पाईप सह 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त

Rahuri इलेक्ट्रिक मोटार व 30 पाईप सह 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक 6 जुलै 2024 23 जुलै 2024 दरम्यान फिर्यादी नामे भोजराज भानुदास गाडे वय 64 वर्ष धंदा शेती राहणार मल्हारवाडी तालुका राहुरी यांचे घोरपडवाडी शिवारातील ठिबक साठी जोडलेले दहा हजार रुपये किमतीचे 30 पाईप तसेच श्री अंशा बापूरावजी येळे, रेवन तुळशीराम हापसे व पोपट काशिनाथ थोरात यांचे विहिरीतील इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर अज्ञात इस मागणी चोरून नेल्याबाबत भारतीय न्यायचा कलम 303 दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदरची चोरी ही इसम नामे सोमनाथ यादव बर्डे राहणार केकताई वस्ती चिंचाळे तालुका राहुरी यांनी केली असल्याची माहिती मिळाली वरून सदर आरोपीस अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान त्याने चोरून नेलेले पाईप आरोपी वाटाण्या करीत असलेल्या शेतातून काढून दिल्याने ते भारतीय साक्षाधिनियम 23(२) अन्वये तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार औटी यांनी जप्त केले. तसेच 30 पाईप सोबतच चोरीस गेलेली मोटर असा एकूण 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे , उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार औटी, तपास पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस नाईक प्रवीण बागुल, गणेश सानप, पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख , अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे यांनी केली.