कृषीवार्ता

विकसीत भारत कार्यशाळेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा सहभाग*

*विकसीत भारत कार्यशाळेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा सहभाग*

 

 

नवी दिल्ली येथे विकसीत भारत @1947 युवकांचा आवाज या उपक्रमाची सुरुवात देशाचे मा. पंत्रप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केली. सदर कार्यशाळा देशभरातील राजभवनांमध्ये आयोजीत करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या राजभवनामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, जैव तंत्रज्ञान विभागाचे सहयागी प्राध्यापक डॉ. पवन कुलवाल, अधिष्ठाता कार्यालयाचे डॉ. रवी आंधळे, पुणे कृषि महाविद्यालयातील पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील डॉ. सोमनाथ माने आणि राज्यातील कृषि,अकृषि विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते. यावेळी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. 

 यावेळी मुंबई येथील राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल श्री. रमेस बैस मार्गदर्शन करतांना म्हणले की भारताच्या आर्थिक विकासात विद्यार्थ्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. आपल्याला कृषि क्षेत्राच्या विकासाबरोबरच सेवा क्षेत्राचाही विकास करावा लागणार आहे. त्यासाठी प्रथम मानवी संसाधनांचा विकास महत्वाचा ठरणार आहे. त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून आपल्याला उर्जा, अन्न व पानी यामध्ये आत्मनिर्भर व्हावे लागेल. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी कृषि तसेच पशुसंवर्धन या विषयांचा भारताच्या विकसातील वाटा या विषयावरील चर्चासत्रात मार्गदर्शन करतांना म्हणाले की विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शेतीमध्ये संरक्षीत शेतीबरोबरच डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी ठरणार आहे. यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठात शेतीमध्ये डिजीटल पध्दतीचे तंत्रज्ञान त्याचबरोबर ड्रोन तंत्रज्ञान, विविध मोबाईल अॅपचा वापर यावरील संशोधनावर भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन विद्यापीठातील 31 शास्त्रज्ञ, 12 अधिकारी आणि 97 विद्यार्थ्यांना अमेरिका, जपान, थायलाँड, मलेशिया आणि व्हियतनाम या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी पाठविले आहेत. 

 सदर कार्यशाळेमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालय, सर्व कृषि महाविद्यालये, सर्व संशोधन केंद्रे, सर्व कृषि विज्ञान केंद्रे, सर्व कृषि तंत्र विद्यालयातील अधिकारी, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रशिक्षण हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी पदव्युत्तर महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. मिलिंद अहिरे, डॉ. भगवान ढाकरे, डॉ. अण्णासाहेब नवले, डॉ. अनिल काळे, डॉ. वाणी, डॉ. विश्वनाथ शिदे, प्राध्यापक व पदव्युत्तर महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे