राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन हद्दपार इसमावर राहुरी पोलिसांनी केली कारवाई .

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन हद्दपार इसमावर राहुरी पोलिसांनी केली कारवाई .
राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील शरीराविरुद्ध व मला विरुद्ध गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार नामे 1)गोरख अशोक बर्डे रा.राहुरी खुर्द ता. राहुरी ,2)राकेश उर्फ ज्याक्यासंजय माळी रा. एकलव्य वसाहत ता.राहुरी यांना आगामी लोकसभा निवडणूक व सण उत्सवाच्या अनुषंगाने मा.उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर यांच्या आदेशाने पुढील दीड वर्षाकरिता अहमदनगर जिल्हा स्थळ सीमेचे हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.
1) गोरख अशोक बर्डे यास पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात शिरूर पोलीस ठाणे हद्दीत सोडण्यात आले आहे. तसेच 2)राकेश उर्फ ज्याक्या संजय माळी यास औरंगाबाद जिल्ह्यात येथे सोडण्यात आले आहे
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी डॉ श्री बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड ,पोहे का शेळके,पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव,पोलीस नाईक अमित राठोड,नदीम शेख.गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, यांच्या पथकाने केलेली आहे.