साई पालखीचे आज आगमन

गेवराईत साई पालखीचे आज आगमन
साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर कारखाना ते शिर्डी या साई भक्तांची पायी पालखी सोहळा साईबाबांच्या नामाचा जयघोष करत शिर्डीकडे रवाना होत असून गुरुवार दि.२६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता गेवराई शहरातील जायकवाडी वसाहत येथील रूद्रेश्वर मंदिर या ठिकाणी मुक्कामी दाखल होत असून साईभक्तांनी साईंच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अंबासाखर कारखाना येथील साई पालखी मराठवाड्यातील मानाची पाहिली पालखी म्हणून ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षापासुन पालखी सोहळा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे मार्गस्थ होत असतो.प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता हा सोहळा शेकडो साई भक्तासह गेवराई शहरात दाखल होणार आहे. तरी गेवराईच्या साईभक्तांनी साई पालखीच्या जोरदार स्वागतास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साई सेवा मंडळ यांनी केले आहे.