उक्कलगाव सप्ताहाची गुरुवारी ह भ प जगन्नाथ महाराज यांच्या किर्तनाने सांगता

उक्कलगाव सप्ताहाची गुरुवारी ह भ प जगन्नाथ महाराज यांच्या किर्तनाने सांगता
बेलापुर (प्रतिनिधी )- श्री हरिहर केशव गोविंद भगवान श्री क्षेत्र उक्कलगाव हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी या कालावधीत उक्कलगाव येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन या सप्ताहाची सांगता ह भ प जगन्नथ महाराज पाटील भिवंडी यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे उक्कलगावचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद भगवान देवस्थानच्या प्रांगणात महंत रामगिरीजी महाराज व महंत उध्दवगीरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वअखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत असुन त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दररोज पहाटे ५ ते ६.३० वाजेपर्यंत काकडा भजन , सकाळी ६.३० ते ७ आरती , सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यत प्रसादभोजन सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत हरिपाठ रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत हरिकिर्तन अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथ मिरवणूक सायंकाळी ७ ते ९ ह भ प अरुणगीरीजी महाराज भामाठाण यांचे किर्तन व गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत वाणीभुषण ह भ प जगन्नाथ महाराज पाटील भिवंडी यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असुन त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज सायंकाळी ७ ते ९ हरी किर्तन नंतर महाप्रसाद असा उपक्रम सप्ताहभर सुरु आहे ह भ प बाबा महाराज मोरे ह भ प नामदेव महाराज मोरे ह भ प रविंद्र महाराज मुठे ,ह भ प उल्हास महाराज तांबे ह भ प बाबासाहेब महाराज ससाणे हे व्यासपीठ चालक म्हणून काम पहात आहेत तरी भावीकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे