इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन

इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन
तालूक्यातील टाकळीभान येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळच्या ग्रामीण माध्यमिक विदयालयाच्या इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे
शिष्यवृत्ती परीक्षा- २०२२ मध्ये एकूण ८ विद्यार्थी प्रविष्ठ होते हे सर्व विद्यार्थी पात्र झाले आहे.
विद्यालयातील ऋतुराज सोमनाथ नाईक गुण २१२, अपेक्षा अरुण रणनवरे २०२ गुण, सत्यजित गोकुळदास नाईक १९४ गुण, सचिन संतोष जाधव १९२ गुण, पियंशु विलास शिंदे १९२ गुण, हर्षदा विठ्ठल दाभाडे १८६ गुण, साई दिपक पवार१८६ गुण, वैष्णवी नामदेव कांबळे १६४ गुण मिळविले आहेत.
विद्यालयाची आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गौतम राजेंद्र भांड १८४ गुण, निरंजन सोमनाथ नाईक १५६ गुण मिळवून घवघवीत यश मिळविले आहे.
या विद्यार्थ्यांना एस.के गुंड, .व्हि.सी त्रिभुवन, एस .बी औताडे, व्ही पी भगत, श्री. भोंगे, श्रीमती राव यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विदयालयाचे मुख्याध्यापक रविंद्र औताडे ,जेष्ठ शिक्षक श्री.जावळे, श्री.गंधारे, श्री.लोखंडे, एस डी नाईक, ए. बी दाभाडे , डी.बी मुठे, पी. आर निकम, संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ लोखंडे, संस्थेचे उपाध्यक्ष.दत्तात्रय नाईक ,संस्थेचे सचिव राजेंद्र भांड ,गटशिक्षणाधिकारी श्रीमती. सामलेटी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.