कारेगाव येथील दरोड्यातील गुन्हेगार पकडण्यास गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांना यश…

कारेगाव येथील दरोड्यातील गुन्हेगार पकडण्यास गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांना यश…
कारेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. पंढरीनाथ पा. वाघ यांचे वस्तीवर शनिवारी पहाटे पडलेल्या दरोड्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख (एलसीबी)श्री. अनिल कटके साहेब यांच्या पथकाने अवघ्या दोन दिवसात पुर्ण करुन मुद्देमालासह आरोपी जेरबंद केले. त्याबद्दल वाघ पा. कुटुंबीय व ग्रामस्थांच्या वतीने अहमदनगर येथे पोलीस अधिक्षक कार्यालयात भेट घेऊन पोलीस यंत्रणेचे अभिनंदन व आभार व्यक्त करतांना गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर श्री अनिल कटके यांचे समवेत श्री. पंढरीनाथ वाघ, कारेगावचे सरपंच श्री.आनंद वाघ, माजी सरपंच शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, भाजपचे शिवाजीराव दोंड, ग्रा.पं.सदस्य सुनिल पटारे, नवनाथ वाघ, शरद वाघ, निखिल वाघ शुभम वाघ, गुन्हे अन्वेषण विभागाचे श्री. शंकर चौधरी व कारेगांव ग्रामस्थ.