देवगडचे उत्तराधिकारी ह.भ.प.स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे गुरुवारी नेवासा येथे कीर्तन

देवगडचे उत्तराधिकारी ह.भ.प.स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे गुरुवारी नेवासा येथे कीर्तन
नेवासा(प्रतिनिधी)श्री क्षेत्र देवगड श्री दत्त मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे गुरुवारी दि.२६ मे रोजी रात्री ७ ते ९ यावेळेत कीर्तन होणार असून देवगडचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थानच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली.
गुरुवारी वैशाख वद्य एकादशी या माउलींच्या एकादशीचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे.त्या निमित्ताने देवगड संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर विश्वस्त मंडळ,भक्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी फराळ महाप्रसादाचे वाटप उपस्थित वारकरी भाविकांना करण्यात येणार असून स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या होणाऱ्या किर्तन कार्यक्रमाचा व सत्कार समारंभाला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे उपस्थित रहावे असे आवाहन हभप शिवाजी महाराज देशमुख,संस्थान विश्वस्त,भक्त मंडळ, ग्रामस्थ मंडळींनी केले आहे.