व्यक्ती हा प्रभावाने घडत असतो.

व्यक्ती हा प्रभावाने घडत असतो
आपल्याला जीवनातील यश, किर्ती, अपकिर्ती, प्रगती, अधोगती, गुणवत्ता,आचरण, संस्कार , व्यसनाधीनता,या विविध बाबींवर वेळेचा, सहवासाचा, विचारांचा आजुबाजुच्या परिसराचा वातावरणाचा प्रभाव असतोच नव्हे तो आपल्या जीवनावर परिणाम सुद्धा करतो .तसेच आपल्यावर एखाद्या महापुरुषांच्या विचारांचा ,संत महंत सद्गुरु, समाजसुधारक, सिनेमातील नायकाचा ,खालनायकाचा , एखाद्या नाईकेचा , तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडू ,कालवंत ,, राजकीय दिग्गज व्यक्तिमत्व, किंवा समाजातील विविध नामांकित व्यक्ती,या पैकी आपल्या सोयीनुसार कोणाच्या ना कोणाच्या तरी प्रभावात आपण घडत असतो .हे मात्र नक्की आहे.
म्हणून आपण नेहमी आपल्या आजुबाजूला जे ऐकत असतो.तसेच आपल्या पेक्षा वयाने आणि अनुभवाने जी जेष्ठ मंडळी असते .ते आपल्याला आपुलकीने नेहमी सल्ला देत असतात . कि आपण सदा अचरणी, सुसंस्कृत, सद्गुणी योग्य लोकांच्या विचारांच्या सहवासात राहील पाहिजे .तरच आपण उत्तम सद्गुणी सद अचरणी सुसंस्कृत व्यक्तिमत्व घडु शकतो . या मध्ये काही च शंका कुशंका मुळीच नाही. जीवनाच्या विविध वळणावर वेगवेगळ्या टप्यावर आपल्याला ज्या पद्धतीची संगती सहवास लाभतो किंवा ज्या विचारांचा आपल्यावर त्या कालावधीत प्रभाव होत असतो .त्याच पद्धतीने आपण घडतो .हे जीवनातील पुर्ण सत्य आहे .
साधारणतः जीवन जगत असताना आपल्याला लक्षात येत नाही परंतु आपल्या जीवनात अनेक वेगवेगळ्या बाबींचा जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सकारात्मक नकारात्मक परिणाम होत असतो . आपण आपले जीवन घडवत असताना आणि त्या दिशेने प्रयत्न करत असताना प्रयत्न कोणत्याही पद्धतीचे असु द्या कळत नकळत अनेक घटक ,घटना आपल्या जीवनातील परिणामाला कारणीभूत असतात जीवनात कधी कोण सद्गुरू म्हणून लाभेल आणि जीवन उजळून निघेल . तसेच कधी कोणत्या विचारांचा वाईट संगतीचा सहवासाचा परिणाम होईल आणि जीवन उध्वस्त होईल हे हि कोणीही सांगू शकत नाही . आणि आपलं जीवन कशा पध्दतीच जीवन घडेल त्याचे परिणाम काय असतील हे हि ती योग्य वेळ येई पर्यंत कोणाला हि सांगता येण शक्य नाही . समाजात अनेक व्यक्ती चांगले घडविण्यासाठी प्रयत्नशील सदाचारी असतात तर अनेक दुराचारी व्यक्ती वाईट घडविण्यासाठी कार्यरत असतात. अनेक चांगले विचार या सृष्टीवर आहेत. तसेच वाईट विचार पण आहेत .आपण कोणत्या विचारांच्या संगती च्या प्रभावात जातो यावर आपण कोण घडलो. हे अंवलबुन असत . आपण चांगल्या व्यक्ति च्या विचारांच्या प्रभावात गेलो तर योग्य घडतो . आणि चुकीच्या व्यक्तिच्या किंवा चुकीच्या विचारांच्या प्रभावात गेलो तर आपलं कधीच भरून निघणार नाही असे नुकसान होते .पण हे सगळं चालू असताना आपल्याला नेमकं समजत नाही लक्षात येत नाही. त्याचे परिणाम फल स्वरूप आल्यानंतर आपल्याला समजत कि आपण चांगल्या, विचारांच्या प्रभावात होतो कि वाईट विचारांच्या प्रभावात होतो किंवा आपली संगती कशी होती हे अंतिम परिणामा नंतर समजत म्हणून . परिणाम योग्य पाहिजे असेल तर आपल्यावर योग्य विचारांचा योग्य व्यक्तिचा प्रभाव आपल्यावर सदैव असला पाहिजे. म्हणून नेहमी योग्य विचारांच्या संगती च्या व्यक्तिमत्त्वा च्या प्रभावात आपण असलं पाहिजे. जेणेकरून आपल्या वर योग्य प्रभाव होईल . योग्य संस्कार होतील आणि आपण योग्य पद्धतीने घडु.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301