टाकळीभान येथील कापूस व्यापाऱ्याची तीन लाखाची बॅग भरदिवसा लांबविली
टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे रा. मालुंजा ता. गंगापुर जि. संभाजीनगर यांची ३ लाख रुपयांची बॅग लांबवल्याची घटना गुरुवार दि.७ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० च्या सुमारास घडली याबाबत लोखंडे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की
टाकळीभान येथे जयसंताजी ट्रेडींग कंपनी नावाचे कापुस खरेदी करण्याचे दुकान आहे. मी दररोज मालुजा ता. गंगापुर ते टाकळीभान येथे स्वताः चे खाजगी वहनाने ये जा करतो. दि. ०७रोजी सकाळी १०/३० वा. जयसंताजी ट्रेडींग कंपनी नावाचे कापुस खरेदी करण्याचे दुकान उघडले. त्यानंतर एका ग्रहाकाने कापसाने भरलेल्या गोण्या विकण्यासाठी दुकानामध्ये ठेवल्या व बील घ्यायला थोड्यावेळाने येतो असे म्हणुन तो निघुन गेला. दुकानामध्ये असलेले कामगार बाळु कडु जोगदंड
व उपसरपंच सतीष खंडागळे यांना गोण्याचे वजन करून
घेण्यास सांगितले. त्यांनी त्या गोण्याचे वजन करून,
दुकानात बाजुला ठेवुन मी त्याचे बील बनवले. त्यानंतर मी त्यांना पाण्याचे जार घेवुन येण्याससांगितले असता ते
गावामध्ये गेले. त्यानंतर श्रीरामपुर नेवासा रोड लगत मी दुकानाच्या बाहेरील रोड लगत झाडाजवळ एकटाच खुर्चीवर बसलेलो होतो. माझ्या डाव्या हाताच्या बाजुला
पैसे असलेली काळ्या रंगाची ऑफीस बॅग ठेवलेली होती. त्यामध्ये रोख रक्कम रु ३लाख /- रू असलेली त्यामध्ये आधार कार्ड व पॅन कार्ड, आय डी बी आय,बँकेचे ए टी एम कार्ड असे असलेली , बॅग ही एक
अनोळखी इसम वय अंदाजे २५ ते ३० वयाचा असलेला
याने मागुन येवुन बॅग उचलुन घेवुन श्रीरामपुरच्या दिशेने
पळत सुटला, त्यावेळी मी आरडा ओरडा करून ,त्याच्या
बसलेले होते, गाडी चालू असताना बॅग घेऊन पळून गेले. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पी आय, दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे ,का,
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.