गुन्हेगारीराजकिय

निवडणूकीच्या तोंडावर बनावट ओळखपत्र बनविणाऱ्यांचा धंदा तेजीत -मुथा यांचा आरोप

निवडणूकीच्या तोंडावर बनावट ओळखपत्र बनविणाऱ्यांचा धंदा तेजीत -मुथा यांचा आरोप

 

बेलापुर (प्रतिनिधी )- देशात होणाऱ्या निवडणूका या पारदर्शीपणे व्हाव्यात या उदात्त हेतूने बारा ओळखपत्रांची यादी जाहीर केली.मात्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदाराकडे असल्यास तो मतदान करू शकेल.असे असले तरी बारा पैकी अकरा ओळखपत्र हे बनावट असु शकते असा दावा येथील भाजपाचे जेष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुथा यांनी केला आहे.

या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सुनिल मुथा यांनी म्हटले आहे की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस ओळखपत्रे तयार करण्याचा गोरख धंदा जोरात सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पारदर्शी मतदानाच्या मूळ हेतुलाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे..

या प्रकाराची खातर जमा करण्यासाठी बेलापूर येथील भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी काही प्रतिष्ठित व्यक्तींचे बोगस आधार कार्ड बनवून घेऊन या कृत्याचा पर्दाफाश केला आहे.त्यांनी समाजातील काही जबाबदार व्यक्तींचे बनावट ओळखपत्र कसे तयार होते याचा अनुभव स्वतः घेतला.काही लोक कागदपत्राची पडताळणी न करता बनावट आय डी प्रुप तयार करुन देत असल्याचा आरोप मुथा यांनी केला आहे .

यामुळे मतदान केंद्राच्या ठिकाणी ओळखपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी मजबुत यंत्रणा असणे अत्यावश्यक बनले आहे. याखेरीज बोगस मतदान टाळणे केवळ अशक्य असल्याची चिंता सुनील मुथा यांनी व्यक्त केली आहे.

या बोगस ओळखपत्रांचा वापर करून एसटी महामंडळालाही दरवर्षी लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याचेही बऱ्याच प्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असे बोगस ओळखपत्र वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मार्फत हे ओळखपत्र बनवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे.

तरी निवडणूक आयोगाने सदर बाब गांभीर्याने घेऊन त्याकरीता आवश्यक असलेल्या उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात अशी मागणी सुनील मुथा यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात केली आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे