नगर शिर्डी रस्ता दुरुस्ती साठी मोठा डोंगर पोखरून लाखोंचा महसूल बुडवून देहरे वांबोरी रोडलगत दगड खाणीतून होतेय बेकायदेशीर रित्या उत्खनन

नगर शिर्डी रस्ता दुरुस्ती साठी मोठा डोंगर पोखरून लाखोंचा महसूल बुडवून देहरे वांबोरी रोडलगत दगड खाणीतून होतेय बेकायदेशीर रित्या उत्खनन .. !!
निवेदनांना दाखवले जाते केराची टोपली … !!
प्रतिनिधी)मोहन शेगर सोनई सोनई,वांबोरी रोडला देहरे इस्लामपूर शिवेवर नगर- मनमाड रोडचे काम करणाऱ्या मुजोर
शिंदे डेवलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कंपनीच्या ठेकेदाराकडुन दगडखाणीत बोअरवेल व ब्लास्टिंग करण्यासाठी शासनाची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता डोंगरच्या डोंगर पोखरून धोकेदायक पध्दतीने दिवसाढवळ्या व पहाटेच्या सुमारास फार मोठ्या प्रमाणात डेटोनेटर ( जिलेटीन ) सारखे तीव्र स्फोटकं बोअरवेल मध्ये टाकुन बोअर ब्लॅस्टींग करून ( सुरुंग ) उडवुन नियमांना पायदळी तुडवून उत्खनन करून निव्वळ धुमाकूळ घातला आहे .
त्यामुळे शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडाला आहे . आणि बुडणार आहे . सदर दगडखाण वांबोरी व देहरे रस्त्यावर वरच असून सर्व नियम धाब्यावर बसवून हे अनधिकृत उत्खनन मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या चालू आहे . यात अनेक अधिकारी सामिल असून सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन सुध्दा दिलेले असताना साधी चौकशी सुध्दा केली गेलेली नाही .
इतर सर्व सामान्यांना नियमांचे पाढा वाचणारे अधिकारी मात्र मिलिभगत करून कुंभकर्णी झोपेत दिसतात . खाणी जवळ असलेल्या सरक परिवाराने व ग्रामस्थांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन … ! प्रशासनाकडून होते डोळेझाक .. !! आजुबाजुच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतात वास्तव्य करणाऱ्या रहिवाशी , त्यांच्या पशुधनास तसेच देहरे – वांबोरी रोडवरुन प्रवास करणारे एमआयडीसी कामगार व इतर प्रवासी यांचे जनजीवन पुर्ण धोक्यात आलेले आहे .
I तरी महसूल अधिकारी आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख अधिकारी मात्र हप्ताखोरी चालू असल्यामुळे झोपेचे सोंग घेऊन काहिच घडत नाही असे दाखवतात . ही शोकांतिका आहे . या परिसरात रस्त्यावरच असलेल्या दगडखाणीतून विषारी स्फोटके वापरून सुरूंग उडविण्यात येतात , तेव्हा हा स्फोट इतका भयानक असतो की , या स्फोटाची उंची अर्धा किमी पर्यंत असते . यामुळे खाणी शेजारी असलेले नागरिक व पशुधन बेदरलेल्या अवस्थेत दिसतात . तसेच पुर्वी शेजारील एका घरा जवळील शेडवर सुरुंग स्फोट झाल्यानंतर दगड पडुन शेडचा पुर्ण पत्रा तुटून सरक परिवारातील दोन व्यक्ती बालंबाल बचावले . तसेच एका महिलेस एक दगड जोरात उडुन लागला होता त्यामुळे ती महिला जबर जखमी झाली होती . परंतु सुदैवाने त्यावेळी प्राणहानी झाली नाही . तसेच सदर शिंदे डेवलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हायवा टिप्पर व इतर गाड्या छोट्या रस्त्यावर भरधाव वेगाने धावत असल्याने वांबोरी रोडवरील शाळेतील लहान मुलांना व जाणार्या प्रवाशांना धोका निर्माण
धावत असल्याने वांबोरी रोडवरील शाळेतील लहान मुलांना व जाणार्या प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे . त्याचप्रमाणे स्फोट केल्यानंतर दोन दोन तास विषारी वायू पसरल्यामुळे अनेकांना विविध आजार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही . अशा अनेक घटना राजरोसपणे घडत असताना महसूल अधिकारी व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी व कर्मचारी गाढ झोपेत दिसत आहेत .
यासाठी संबंधित प्रशासनाने या भयावह गोष्टीकडे त्वरित लक्ष द्यावे व संबंधितांवर उचित कार्यवाही करावी . अन्यथा गावकऱ्यांच्यावतीने लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ” ढोल बजाओ आंदोलन ” करण्यात येईल . असा इशारा वांबोरी , इस्लामपूर व देहरे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येत आहे . जर यापुढील काळात या परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहिल . असेही ग्रामस्थांनी सांगितले आहे .
सोनई प्रतिनिधी
मोहन शेगर