टाकळीभान गाव असे आहे की,कायद्याचा मान सन्मान राखून येथील सर्व सण—उत्सव व सर्व महा पुरूषांच्या जयंत्या सर्व धर्मियांच्या वतीने गुण्या गोविंदाने साजरे होतात=सपोनि शरदराव चौधरी

टाकळीभान गाव असे आहे की,कायद्याचा मान सन्मान राखून येथील सर्व सण—उत्सव व सर्व महा पुरूषांच्या जयंत्या सर्व धर्मियांच्या वतीने गुण्या गोविंदाने साजरे होतात=सपोनि शरदराव चौधरी
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गाव असे आहे की,कायद्याचा मान सन्मान राखून येथील सर्व सण—उत्सव व सर्व महा पुरूषांच्या जयंत्या सर्व धर्मियांच्या वतीने गुण्या गोविंदाने साजरे होतात हा निश्चितच याचा पोलीस विभागाला अभिमान आहे .असे प्रतिपादन श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि शरदराव चौधरी यांनी केले
टाकळीभान येथे गणेश—उत्सवा निमित्ताने शांतता कमिटीची बैठक टाकळीभान पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी चौधरी बोलत होते .यावेळी तालुका काॅग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे,अशोकचे संचालक यशवंत रणनवरे,उपसरपंच कान्हा खंडागळे,रिपाई नेते आबासाहेब रणनवरे,युवक नेते भाऊसाहेब पवार,जयकर मगर सर,माजी ग्रा.प.च सदस्य आप्पासाहेब रणनवरे.सुंदर रणनवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलतांना चौधरी म्हणाले की,गणेश उत्सवाच्या काळात वादग्रस्त जागेत गणपती बसवत असतांना ग्राचायतीची परवानगी व पोलीस विभागाची आॅनलाईन परवानगी घेवूनच नियोजित जागेत गणपती बसवावेत कारण धार्मिकतेचा गुन्हा कायम स्वरुपी त्यांच्या खांद्यावर असतो त्यामुळे असे गैरकृत्य करू नका असे अाहवान करीत गणपती उत्सवाच्या वेळी कोणतेही अवैध व्यवसाय अगर मध्यपान न करता गणेश भाविक भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्व गणेश मंडळाने काळजी घेवून गणेश विसर्जनाच्या वेळी डीजेला तर कोणतीच परवानगी नाही पण तुमच्या गावपातळीवर आवाज कमी ठेवून कोणालाही ध्वनी प्रदूषनाचा त्रास होणार नाही याची पण काळजी घेण्यात यावी असेही चौधरी यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र कोकणे, कान्हा खंडागळे, मगर,आप्पासाहेब रणनवरे यांनी सांगितले की, गणेश उत्सवाच्यावेळी सर्व जाती धर्माचे एकत्रीत येवून सण उत्सव व महापुरूषांच्या जयंत्या साजर्या केल्या जातात.याचा ताण पोलीस विभागाला पडू देत नाही याची आम्ही नेहमी काळजी घेतो. कार्यक्रमाचे आभार उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी मानले