महाराष्ट्र

परळीच्या उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रस्ता मजबुतीकरण करावे अॅड. मनोज संकाये यांची बीडच्या पत्रकार परिषदेत मागणी

परळीच्या उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रस्ता मजबुतीकरण करावे अॅड. मनोज संकाये यांची बीडच्या पत्रकार परिषदेत मागणी

 

परळीच्या उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रस्ता मजबुतीकरण करावे अॅड. मनोज संकाये यांची बीडच्या पत्रकार परिषदेत मागणी

 

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना दिले निवेदन

 

बीड दि. 6-: परळी शहरातील शिवाजीनगर जवळ असलेल्या डॉ .शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रोडवरून मोठ्या प्रमाणात 12 टायर ट्रक मालवाहतूक करतात त्यामुळे येथील परिसरात नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे येथील रस्त्याचे मजबुतीकरण करावे आणि या भागातील नागरिकांना आरोग्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी बीड येथील पत्रकार परिषदेत केली. दरम्यान अॅड. संकाये यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. परळी शहरात असलेल्या उड्डाणपुलाखाली ट्रान्सपोर्ट रोडवरून रेल्वेचा माल आठवड्यातून चार ते सहा वेळेस येतो तो माल खाली करण्यासाठी ट्रक चा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे तेथील परिसरात प्रदूषण होत आहे. धूळ उडत असल्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. या धुली कणांमुळे नेहमी सर्दी होणे, खोकला, अंगदुखी ताप यासारख्या आजारांना नागरिक बळी पडत आहेत. प्रदूषणामुळेच असे आजार होतात. त्यातच मोठे वाहने त्या रोडवरून मालवाहतूक करत असताना धुलीकन हवेत पसरतात हवेत धुलीकन पसरल्यामुळे समोर आलेले वाहने दिसत नाहीत त्यामुळे उड्डाणपुलाजवळ अनेक अपघात होण्याची शक्यता आहे. आजारांमुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसत आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण करावे आणि नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी अॅड. मनोज संकाये यांनी केली. बीड येथील शासकीय विश्रामगृहावर संकाये यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. 

 

जिल्हाधिकारी यांना निवेदन

         

 

दरम्यान आपण नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याने अॅड. मनोज संकाये यांनी आज बीड येथे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले .यावेळी जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .पत्रकार परिषद आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना अॅड. मनोज संकाये यांच्यासोबत जोशी समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ज्ञानदेव आंबुरे, राहुल कांदे, शिवा बडे, बालासाहेब चाटे, काशिनाथ सरवदे, सुदंर आव्हाड, बालाजी गुट्टे, शिवाजी मुंडे, लक्ष्मण बोले आदींची उपस्थिती होती

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे