आषाढी वारीच्या तयारीला वेग..* *आळंदीत अतिक्रमण मोठी कारवाई सुरू*

*आषाढी वारीच्या तयारीला वेग..*
*आळंदीत अतिक्रमण मोठी कारवाई सुरू*
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात साजरा केला जावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलीय. या पार्श्वभूमीवर आळंदी शहरातील विविध भागात असणारे अतिक्रमण काढण्यासाठी आळंदी नगरपरिषद आणि पोलीस यंत्रणे च्या सहाय्याने कारवाई केली जात आहे आज आळंदी नगर परिषदेचे अधिकारी सचिन गायकवाड नगरपरिषद शिपाई कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक गायकवाड आणि पोलीस स्टेशन पोलीस कुमक महाराष्ट्र सुरक्षा दलचे शिपाई कर्मचारी यांनी एक ट्रॅक्टर जेसीपी आणि मनुष्यबळ यांचा वापर करत रस्त्याला अडथळे होणारी अतिक्रमणावर कारवाई केल्या माऊलींची वारी मोठी भरणार असून त्यामध्ये भाविकांना सुख सुविधा प्राप्त होण्यासाठी प्रशासन सज्ज झाले ते दिसले.
आळंदी शहरातील व्यापारी यांना यापूर्वीच नगरपरिषदेने सूचना दिल्या होत्या रस्त्यावर असणाऱ्या अडथळे आणि उत्पाद मोकळे राहावे यासाठी काळजी घ्यावी अशी सूचना दिलेल्या असतानाही काही प्रमाणात असलेले अतिक्रमण आज काढण्यात आली दिनांक 11 जून रोजी माऊलींचे प्रस्थान होत आहे मोठ्या प्रमाणात भावी आळंदी मध्ये येणार आहेत यासाठी प्रशासन गंभीर असून सर्व उत्साहाने आणि शांततेने पार पडावे यासाठी तयारीला लागलेल्या छोटे मोठे हात गाडीवाले पाथरी व्यवसाय आणि सूचना देऊ नये अतिक्रमण काढल्यानंतर आज कारवाई करण्यात आली त्यांचे सामान जप्त करत नगरपरिषदेने ट्रॅक्टर मध्ये टाकून नगरपालिकेच्या गोडाऊनमध्ये स्थलांतरित केले आहे.
नदीपलीकडील भागात जेथून दर्शन बारी जाणार आहे त्या ठिकाणी एका व्यक्तीने नवीन स्वच्छ टपरी बांधल्याचे निदर्शनास आले नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी त्यावर ताबडतोब कारवाई करत ती टपरी बाजूला करून दर्शनबारीसाठी देऊ फाट्यावरील रस्ता मोकळा केला आहे पुढील काळातही ही कारवाई अशीच चालू राहणार असल्याचे आळंदी नगर परिषदेचे कर्मचारी सचिन गायकवाड आणि आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण गायकवाड यांनी सांगितले आहे