*पुणे तेथे काय उणे….सर्व धर्माचे धर्मगुरू निमंत्रित करत येरवडा पोलीस आणि खादिम मुजावर यांची शाहादावल बाबा दर्ग्यावर इफ्तार पार्टी.*

*पुणे तेथे काय उणे….सर्व धर्माचे धर्मगुरू निमंत्रित करत येरवडा पोलीस आणि खादिम मुजावर यांची शाहादावल बाबा दर्ग्यावर इफ्तार पार्टी.*
येरवडा पोलीस स्टेशन व सर्व मुस्लिम बांधव यांच्या संयुक्त विद्यमानाने येरवडा येथील हजरत शहादावल बाबा दर्गा येथे सामुदायिक इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. हिंदू मुस्लिम ऐक्य भावना जपावी तसेच जातीय सलोखा टिकवण्यासाठी खादीम अकिल मुजावर.तसेच कॅप्टन इक्राम खान भाईजान यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली या इतर पार्टीचा आयोजन येरवडा पोलीस स्टेशन यांच्यावतीने करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीसाठी विशेष म्हणजे सर्व धर्माचे धर्मगुरू आमंत्रित होते यात मुस्लिम समाजाच्या वतीने चकलंबा येथील हजरत मेहबूब मीया कादरी.बौद्धधर्मियांच्या वतीने भंते हर्षवर्धन शाक्य हडपसर, जेतवन बुद्धविहार, तर ख्रिचन धर्म गुरू फादर रेव्ह. किशोर गवई, अशोकनगर चर्च यांचा विशेष सहभाग होता,तसेच हिंदु
धर्मियांच्या वतीने श्री दत्तात्रय कानिफनाथ सेवा ट्रस्टचे परम पूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज गरुड. व त्यांच्या भाविकांची मोठी गर्दी शाहदावल बाबा दर्गा येरवडा. येथे दिसुन आली. यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लिमांना तर मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना फलाहार घास भरवत उपवास सोडलेचे दिसून आले. हिंदू मुस्लिम ऐक्य.जातीय सलोखा जपण्यासाठी. मोठ्या प्रमाणात हिंदू बांधवांनी घेतलेला सहभाग ही या कार्यक्रमाची विशेष बाब मानावी लागेल.हिंदू भाविकांनी मुस्लिम बांधवांसोबत इफ्तार करत जातीय सलोख्याची परंपरा कायम ठेवली.यावेळी निमंत्रित म्हणून माजी पोलीस महासंचालक के.के. कश्यप. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार.पोलीस उपायुक्त पुणे शहर संदीप कर्णिक.अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार. अप्पर पोलीस सह आयुक्त गुन्हे विभाग पुणे शहर रामनाथ पोकळे. सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर किशोर जाधव.सहाय्यक पोलीस उप आयुक्त पुणे शहर शशिकांत बोराटे. सर्व पोलिस वरीष्ठ अधिकारी सामाजिक बांधिलकी जपत उपस्थित होते.पोलीस खात्यातील उच्च अधिकारी एकाच ठिकाणीं एकत्र येण्याची ही पुण्यातील प्रथमच घटना मानली जात आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आयोजक खादिम अखिल मुजावरआणि कॅप्टन इक्राम खान भाईजान आणि येरवडा पोलीस स्टेशन यांना हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बांधवांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल हजरत शादल बाबा दर्ग्याच्या पवित्र ठिकाणी पवित्र रमजानच्या दिवशी शुभकामना दिले आहेत.