रक्तदान करून, वृक्षारोपण करून व फळे कापुन वाढदिवस साजरा*

*रक्तदान करून, वृक्षारोपण करून व फळे कापुन वाढदिवस साजरा*
समाजसेवा फाउंडेशनचे बिन्नीचे शिलेदार श्री.नरेंद्र रत्नपारखी यांनी आपला वाढदिवस वाय.सी.एम.
रक्तसंकल केंद्र येथे जाऊन रक्तदान करुन साजरा करण्यात आला.
रक्तदान झाल्या नंतर ते आणि ह्यांचे सहकारी श्री.महमंदशरीप मुलाणी, श्री.नागेश भिंगोले,श्री.राजु पेठे, श्री.अतुल शिंदे,श्री.माणिक भोसले ह्यांनी केक न कापता कलिंगड कापुन वाढदिवस साजरा केला.सध्याच्या पाश्चिमात्य संस्कृती बाजुला ठेवून व पर्यावरण पुरक अभिनव पद्धतीने वाढदिवस साजरा केला.केक, स्प्रे सारख्या वस्तू मुळे डोळ्याला,शरीराला नुकसान पोहोचवू शकतात.सदर कारणाने समाजात चांगला विचार जावा ह्या उद्देशाने ह्रया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचा शेवट वृक्षारोपणा करण्यात आला.
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजू पठे ह्यांनी केले, प्रास्ताविक नागेश भिंगोले ह्यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व मित्रानी सहकार्य केले.*