शालेय विद्यार्थांना चिखल ,पाणी तुडवण्याच्या रस्ताच्या असुविधे विरोधात नगरपरिषदेसमोर “लाॅलीपाॅप आंदोलन “:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर*

*शालेय विद्यार्थांना चिखल ,पाणी तुडवण्याच्या रस्ताच्या असुविधे विरोधात नगरपरिषदेसमोर “लाॅलीपाॅप आंदोलन “:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर*
बीड शहरातील भक्ति कन्स्ट्रक्शन भागातील व्यंकटेश पब्लिक स्कूल,नारायण वर्ड स्कूल,श्री.श्री.रविशंकर इंग्लिश स्कूल,सागर इंग्लिश स्कूल तसेच पोदार इंग्लिश स्कूल,आयकाॅन इंग्लिश स्कूल धांडेनगर,जिनियस इंग्लिश स्कूल धानोरा रोड परिसरातील
शाळांना रस्त्याची सुविधा नसल्यामुळेच शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना चिखल तुडवत शालेत जावे लागते. चिखलातून चारचाकी वाहने तसेच दुचाकी वाहने व सायकल फसतात त्यामुळे विद्यार्थांचे हाल होत आहेत तर शहरातील नामांकित संस्कार विद्यालय बीड शाळेच्या सभोवताली पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून पाण्यातुन विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे.
संबधित प्रकरणात मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात तसेच मान्सूनपूर्व कालावधीत नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचत असुन त्याचा निचरा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातुन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे अपघात घडुन दुर्घटना होण्याच्या घटना घडलेल्या आहेत यासाठी दि.२५ जुलै सोमवार रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती डाॅ.गणेश ढवळे, शिक्षण हक्क कार्यकर्ते मनोज जाधव, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर , शेख मुबीन,बलभीम उबाळे,यांनी आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
लोकप्रतिनिधी,नगरपरिषद प्रशासनाकडून पालकांची दिशाभूल लाॅलीपाॅप आंदोलन बीड शहरातील शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातून तसेच चिखलातून प्रवास करावा लागत असून नगरपरिषद प्रशासन व लोकप्रति निधींकडून पालकांची व तक्रारदारांची असुविधाबाबत उपाययोजना करण्याविषयी दिशाभूल करत असून केवळ लाॅलीपाॅप देण्याचे काम करत असून त्याच्या निषेधार्थ “लाॅलीपाॅप आंदोलन करण्यात येणार आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर